साधी-सरळ कथा प्रेक्षकांच्या मनाला भावली! ६ दिवसांत 'ही' सीरिज ओटीटीवर बनली नंबर १, कुठे बघाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 15:42 IST2026-03-12T15:40:07+5:302026-03-12T15:42:25+5:30

ओटीटीवर दर आठवड्याला नवनव्या कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. ज्यामुळे प्रेक्षकांचं थिएटरपेक्षा ओटीटीवर चित्रपट, वेब सीरिज पाहण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे.

hello bachhon series trending on netflix starring vineet kumar singh and girija oak must watch | साधी-सरळ कथा प्रेक्षकांच्या मनाला भावली! ६ दिवसांत 'ही' सीरिज ओटीटीवर बनली नंबर १, कुठे बघाल?

साधी-सरळ कथा प्रेक्षकांच्या मनाला भावली! ६ दिवसांत 'ही' सीरिज ओटीटीवर बनली नंबर १, कुठे बघाल?

Webseries: ओटीटीवर दर आठवड्याला नवनव्या कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. ज्यामुळे प्रेक्षकांचं थिएटरपेक्षा ओटीटीवर चित्रपट, वेब सीरिज पाहण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. हल्ली डिजीटल प्लॅटफॉर्मवर अनेक जुने-नवे चित्रपट आणि सीरिज ट्रेंडिंगमध्ये असतात. त्यामुळे सिनेप्रेमी मनोरंजनासाठी या प्लॅटफॉर्मला मोठी पसंती देत असल्याचं पाहायला मिळतं. असाच एक चित्रपट सध्या ओटीटीवर ट्रेंडिंगमध्ये आहे. गेल्या आठवड्यात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या सीरिजची कथा प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे.

गेल्या आठवड्यात नेटफ्लिक्सने एक सीरिज प्रदर्शित झाली आहे. छावा मध्ये कवी कलशची भूमिका साकारणारा अभिनेता विनीत कुमार सिंग तसेच मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक मुख्य भूमिकेत आहे.  एका शिक्षकाच्या प्रवासावर आधारित या सीरिजची ओटीटीप्रेमींमध्ये तुफान चर्चा होत असून या सीरिजला IMDb वर ८.२ रेटिंग मिळाले आहे. दरम्यान, या सीरिजचं नाव हेलो बच्चों असं आहे. अलिकडेच सहा मार्च रोजी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. रिलीजच्या अवघ्या ६ दिवसांतच या सीरिजने ओटीटीवर नंबर स्थान मिळवलं आहे. या सीरिज फक्त पाच भाग आले आहेत. 

कथानक 

‘हेलो बच्चों’ ही सीरिज ‘फिजिक्सवाला’चे संस्थापक अलख पांडे यांच्या जीवनावर आधारित आहे. एका शिक्षकाच्या प्रवासावर आधारित ही कथा आहे. एका छोट्याशा शहरात एक सामान्य शिक्षक म्हणून सुरुवात करतो आणि पुढे विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा मोठा शिक्षक बनतो. प्रतीश मेहता यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. ही बहुचर्चित सीरिज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

Web Title : सरल कहानी ने जीता दिल! 6 दिनों में ओटीटी पर नंबर 1 बनी सीरीज।

Web Summary : नेटफ्लिक्स की 'हेलो बच्चों', फिजिक्सवाला के संस्थापक अलख पांडे पर आधारित एक श्रृंखला ट्रेंड कर रही है। विनीत कुमार सिंह और गिरिजा ओक अभिनीत, एक शिक्षक की यात्रा के बारे में इस श्रृंखला को आईएमडीबी पर 8.2 रेटिंग मिली है। रिलीज के छह दिनों के भीतर ही यह नंबर एक पर पहुंच गई।

Web Title : Simple story touches hearts! Series becomes #1 on OTT in 6 days.

Web Summary : Netflix's 'Hello Bachcho' a series based on Physicswallah founder Alakh Pandey is trending. Starring Vineet Kumar Singh and Girija Oak, the series about a teacher's journey, has garnered an IMDb rating of 8.2. It quickly reached number one spot within six days of release.