अखेर प्रतीक्षा संपली..!! न्यूजरूम ड्रामा सीरीज 'द ब्रोकन न्यूज सीझन २'चा ट्रेलर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 19:21 IST2024-04-17T19:20:59+5:302024-04-17T19:21:35+5:30
The Broken News 2 : ‘द ब्रोकन न्यूज’ या बहुप्रतीक्षीत सीरीजच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला.

अखेर प्रतीक्षा संपली..!! न्यूजरूम ड्रामा सीरीज 'द ब्रोकन न्यूज सीझन २'चा ट्रेलर रिलीज
‘द ब्रोकन न्यूज’ या बहुप्रतीक्षीत सीरीजच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. बीबीसी स्टुडिओजच्या ‘प्रेस’ या फॉरमॅटवर आधारित असलेल्या या शोचं दिग्दर्शन विनय वायकुळ यांनी केलं असून संबित मिश्रा यांनी त्याचं लिखाण केलं आहे. नव्या सीझनमध्ये सोनाली बेंद्रे, जयदीप अहलावत आणि श्रिया पिळगावकर त्यांच्या अमीना कुरेशी, दिपांकर सन्याल आणि राधा भार्गव या भूमिकांमध्ये परत एकदा पाहायला मिळतील. दोन वर्षांच्या कालावधीनंतर येत असलेल्या या नव्या सीझनमध्ये ‘जोश 24x7’ आणि ‘आवाज भारती’ या चॅनेल्समधला तत्वांचा झगडा नव्या पातळीवर जाताना पाहायला मिळेल. ३ मे रोजी केवळ झी 5 वर याचे प्रीमियर होणार आहे. या थरारक नव्या सीझनमध्ये सत्य आणि सनसनी यांच्यातलं युद्ध न्यूजरूमच्या पलीकडे जात वैयक्तिक पातळीवर अस्तित्वाच्या लढ्यात रुपांतरित होताना दिसेल.
बीबीसी स्टुडिओज प्रॉडक्शन इंडियाची निर्मिती असलेल्या आगामी सीझनमध्ये काल्पनिक आयुष्य, खोटेपणा, प्रेम आणि पत्रकारांमधला संघर्ष, सत्य व सनसनीखेजपणासाठी त्यांच्यात चालणारा झगडा दाखवण्यात आला आहे. आगामी सीझनमध्ये फैजल रशीद, इंद्रनील सेनगुप्ता, संजीता भट्टाचार्य, तोरुक रैना यांच्या व्यक्तीरेखा परत पाहायला मिळतील. त्याशिवाय नव्या सीझनमध्ये अक्षय ओबेरॉय, सुचित्रा पिल्लई आणि गीतिका विद्या ओहल्यान हे नवे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसतील.
अभिनेत्री सोनाली बेंद्रे म्हणाल्या, ‘द ब्रोकन न्यूज माझ्यासाठी कायमच खास राहील, कारण त्यातून मी ओटीटी विश्वात पर्दापण केले. पहिल्या सीझनला मिळालेल्या प्रतिसादानं आम्ही भारावून गेलो होतो. आता दुसरा सीझन येत असल्याचा मला खूप आनंद होतोय. अमीना आणि राधा यांची चांगली टीम होती, मात्र नव्या सीझनमध्ये अमीना एकटीच सत्यासाठी लढा देताना दिसेल. प्रेक्षकांची या शो वर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे. मला खात्री आहे, की सीझन 2 ची निर्मिती करताना आम्हाला जितका आनंद मिळाला, तितकाच आनंद प्रेक्षकांना तो पाहाताना होईल.’
अभिनेते जयदीप अहलावत म्हणाला, ‘झी 5 वर दुसऱ्यांदा द ब्रोकन सीझनचे विश्व खुले होत असल्याचा मला आनंद झाला आहे. यावेळी प्रेक्षकांना या न्यूजरूम ड्रामामधे जास्त नाट्य आणि लढा वैयक्तिक होत असल्यामुळे तत्वाच्या सीमारेषा धूसर होताना पाहायला मिळतील. दिपांकरची भूमिका करणं वेगळाच आनंद देणारं आहे आणि दुसऱ्या सीझनच्या निमित्ताने परत एकदा सर्वांबरोबर काम करणं मजेदार होते.