सत्यकथेवर आधारित हॉरर वेबसीरिज ओटीटीवर करतेय ट्रेंड, IMDb वर १० पैकी ८.८ रेटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 16:57 IST2025-12-14T16:54:20+5:302025-12-14T16:57:56+5:30

या वेबसीरिजमध्ये सस्पेन्सचाही जबरदस्त तडका आहे आणि कमाल म्हणजे IMDb वर रेटिंग १० पैकी ८.८ आहे.

Bhay: The Gaurav Tiwari Mystery Horror Thriller Watch On Amazon Mx Player | सत्यकथेवर आधारित हॉरर वेबसीरिज ओटीटीवर करतेय ट्रेंड, IMDb वर १० पैकी ८.८ रेटिंग

सत्यकथेवर आधारित हॉरर वेबसीरिज ओटीटीवर करतेय ट्रेंड, IMDb वर १० पैकी ८.८ रेटिंग

बॉलिवूडपासून ते साऊथ सिनेमापर्यंत आतापर्यंत असे अनेक चित्रपट आणि वेबसीरिज प्रदर्शित झाल्या आहेत, ज्यांच्या कथांनी थरकाप उडवला आहे. अलीकडेच अशीच एक वेबसीरिज ओटीटीवर रिलीज झाली आहे. जिची कथा थरकाप उडवून टाकणारी आहे. विशेष म्हणजे, ही वेबसीरिज एखाद्या काल्पनिक कथेवर नाही, तर एका वास्तविक जीवनातील घटनेवर आधारित आहे. 

तर या वेबसीरिजचं नाव आहे 'भय: द गौरव तिवारी मिस्ट्री' (Bhay: The Gaurav Tiwari Mystery). ही एक ८ भागांची वेबसीरिज सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालत आहे. ही वेबसीरिज गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाली असून, तिची कथा  गौरव तिवारी यांच्या जीवनावर आधारित आहे. या सीरिजमध्ये गौरव तिवारी यांचा थरारक आणि रहस्यमय प्रवास दाखवण्यात आला आहे. यामध्ये करण टॅकर गौरव तिवारीच्या भूमिकेत आणि कल्की कोचलिन आयरीन वेंकटच्या भूमिकेत दिसणार आहे. या दोघांव्यतिरिक्त याा सीरिजमध्ये दानिश सूद, सलोनी बत्रा, शुभम चौधरी, आणि निमिषा नायर या उत्कृष्ट कलाकारांची टीम आहे.

आयएमडीबीवर  दमदार रेटिंग
'भय: द गौरव तिवारी मिस्ट्री' या वेबसीरिजला आयएमडीबीवर (IMDb) १० पैकी ८.८ इतके प्रभावी रेटिंग मिळाले आहे.  सत्य घटनेवर आधारित हॉरर थ्रिलरचा अनुभव घ्यायचा असल्यास, ही वेबसीरिज अमेझॉन एमएक्स प्लेअर (Amazon MX Player) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन स्ट्रीम झाली आहे.

Web Title : सत्य घटना पर आधारित हॉरर वेब सीरीज ट्रेंड में, IMDb रेटिंग उच्च।

Web Summary : सत्य घटना पर आधारित, 'भय: द गौरव तिवारी मिस्ट्री' ट्रेंड कर रही है। 8 भागों की यह श्रृंखला गौरव तिवारी के रहस्यमय जीवन की पड़ताल करती है, जिसमें करण टैकर और कल्कि कोचलिन हैं। इसे IMDb पर 8.8 रेटिंग मिली है और यह अमेज़न एमएक्स प्लेयर पर स्ट्रीम होती है।

Web Title : Horror web series based on true story trends, high IMDb rating.

Web Summary : Based on a real event, 'Bhay: The Gaurav Tiwari Mystery' is trending. The 8-part series explores Gaurav Tiwari's mysterious life, starring Karan Tacker and Kalki Koechlin. It has an impressive 8.8 IMDb rating and streams on Amazon MX Player.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.