रात्री घराच्या भींतीतून येतात विचित्र आवाज अन् मग...; २ महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेला 'हा' सिनेमा OTTवर ट्रेंडिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 12:43 IST2025-09-18T12:38:09+5:302025-09-18T12:43:45+5:30

शेती विकून घर घेतो अन् फसतो! रात्री भींतीतून येतात विचित्र आवाज,'हा' सिनेमा एकट्यात पाहाल तर चक्रावून जाल

best mystery thriller wall to wall movie now trending on ott must watch it | रात्री घराच्या भींतीतून येतात विचित्र आवाज अन् मग...; २ महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेला 'हा' सिनेमा OTTवर ट्रेंडिंग

रात्री घराच्या भींतीतून येतात विचित्र आवाज अन् मग...; २ महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेला 'हा' सिनेमा OTTवर ट्रेंडिंग

OTT Movie: ओटीटी या माध्यमामुळे सिनेप्रेमींसाठी मनोरंजनाचं नवं द्वार खुलं झालं आहे. आजकाल ओटीटीवर केवळ बॉलिवूडचं नव्हे, तर साऊथ इंडियन सिनेमांपासून ते परदेशी सिनेमांपर्यंत गाजलेले सिनेमे उपलब्ध आहेत. शिवाय त्यांना प्रेक्षकांची देखील तितकीच पसंती मिळताना दिसते आहे.  असाच गेल्या दोन महिन्यापूर्वी रिलीज झालेला चित्रपट तुम्हीही पाहायला हवा. सध्या ओटीटीवर प्रदर्शित होताच हा चित्रपट धुमाकूळ घालतो आहे. एक सामान्य माणूस आपल्या मेहनतीची कमाई हक्काच्या घरासाठी लावतो. याच आशेने की आपलं म्हातारपण सुखात आणि समाधानाने जगता यावं.पण त्यांचं हेच स्वप्न एका भयानक वास्तवात बदलतं.

वॉल टू वॉल असं या सिनेमाचं नाव आहे.हा एक सर्वोत्तम मिस्ट्री थ्रिलर सिनेमा आहे,असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. १ तास ५८ मिनिटांचा हा कोरिअन सिनेमा सध्या नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. किम-ताए-जून आणि शेरोन एस पार्क दिग्दर्शित या चित्रपटात कोरियन अभिनेता कांग हा न्यूल मुख्य भूमिकेत आहे.हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला नाही तर थेट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. 

कथानकाबद्दल जाणून घेऊया...

वू सियोंग या व्यक्तीच्या आयुष्याव बेतलेली ही कथा आहे.जो एका कंपनीत नोकरी करत असतो. शहरात घर घेण्यासाठी तो गावाकडील त्याचं शेत विकतो. नव्या घरात शिफ्ट झाल्यानंतर त्याला वाटतं की आता सगळं सुरळित होणार आहे. मात्र, त्याच्या आयुष्यात काही भलतंच घडतं. त्याच्या नवीन घराच्या भिंतींमधून विचित्र आवाज येऊ लागतात,ज्यामुळे तो कित्येक रात्री जागा राहतो. जेव्हा तो याबद्दल बोलतो तेव्हा त्याचे शेजारी देखील संभ्रमात पडतात. अखेरीस तो या प्रकरणाच्या मुळाशी कसा पोहोचतो. हा आवाज करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यास यशस्वी ठरतो का हे महत्त्वाचं ठरतं. या चित्रपटाची अनोखी कहाणी लोकांना खूप भावली आहे

Web Title: best mystery thriller wall to wall movie now trending on ott must watch it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.