अभिलाष विरुद्ध संदीप भैय्या! मैत्रीमध्ये फूट; पुढे काय?, Aspirants सीझन ३ चा ट्रेलर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 17:19 IST2026-03-06T17:17:07+5:302026-03-06T17:19:59+5:30
अभिलाषला टक्कर द्यायला आला नवा 'डीएम'

अभिलाष विरुद्ध संदीप भैय्या! मैत्रीमध्ये फूट; पुढे काय?, Aspirants सीझन ३ चा ट्रेलर रिलीज
‘द वायरल फीवर’ (TVF) निर्मित ‘ॲस्पिरेंट्स’ सीझन 3 बहुप्रतिक्षित ट्रेलर आज रिलीज झाला. सीरिजचे दिग्दर्शन दीपेश सुमित्रा जगदीश यांनी केले आहे. या सीझनमध्ये नवीन कस्तुरिया, शिवांकित सिंह परिहार, अभिलाष थपलियाल, सनी हिंदुजा, नमिता दुबे आणि तेंगम सेलीन हे त्यांच्या जुन्या भूमिकांमध्ये परतत आहेत, तर जतिन गोस्वामी या वेळी नव्या सदस्याच्या रूपात टीममध्ये सहभागी झाले आहेत. हा सीझन 13 मार्चपासून भारतासह जगभरातील 240 पेक्षा अधिक देश आणि
भारताच्या सर्वात लोकप्रिय मनोरंजन प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या प्राइम व्हिडिओने आज आपल्या लोकप्रिय हिंदी ड्रामा सीरीज ‘एस्पिरेंट्स’च्या तिसऱ्या सीझनचा ट्रेलर रिलीज केला आहे. सीझन 3 सोबत ही कथा एका नव्या टप्प्यावर पोहोचते, जिथे जुन्या महत्त्वाकांक्षा आणि सध्याच्या जबाबदाऱ्या यांच्यात संघर्ष दिसून येतो. मुखर्जी नगरमध्ये सुरू झालेली जुनी स्पर्धा आता सत्तेच्या उच्च पदांवर पुन्हा एकदा समोर येताना दिसते.
ट्रेलर लाँचवेळी अभिनेता नवीन कस्तुरिया म्हणाला, "'ॲस्पिरेंट्स’ माझ्यासाठी नेहमीच खूप खास राहिली आहे, कारण प्रेक्षकांनी फक्त अभिलाषला पडद्यावर पाहिलं नाही, तर त्याच्या प्रवासासोबत स्वतःलाही वाढताना अनुभवले आहे. तिसऱ्या सीझनमध्ये आपण त्याला अशा वळणावर पाहतो, जिथे कागदोपत्री त्याचं स्वप्न पूर्ण झालेलं असतं, पण प्रत्यक्ष आयुष्यातील वास्तव खूप गुंतागुंतीचं असतं. लोकांच्या अपेक्षा, स्वतःच्या मनातील खंत आणि ज्यांनी त्याच्यावर सर्वाधिक विश्वास ठेवला त्या लोकांना गमावण्याची भीती यामध्ये तो अडकलेला असतो. माझ्यासाठी हा भाग खूप दमदार होता, कारण यात दाखवले आहे की जेव्हा सर्व काही दावावर लागलेलं असतं तेव्हा यश कसं वाटतं. या वेळी अभिलाषचं पात्र आपल्या भावना आणि कमतरतांबाबत अधिक प्रामाणिकपणे समोर येईल. लोकांना त्याच्या कथेशी जोडलेलं पाहून मला आनंद होतो आणि त्याचा पुढचा प्रवास कुठे नेतो हे दाखवण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.”
तर सनी हिंदुजा म्हणाला, “सीझन 3 मध्ये मैत्री, स्वप्नं आणि कधीकाळी सोपी वाटणारी आदर्श तत्त्वं यांचं काय होतं, जेव्हा सत्ता, अंतर आणि परिस्थिती त्यांची कसोटी घेतात, हे दाखवलं आहे. या सीझनची खास गोष्ट म्हणजे यशानंतर येणाऱ्या अडचणी – मग त्या कामाशी संबंधित असोत किंवा वैयक्तिक आयुष्याशी – दाखवण्यास ही कथा मागे हटत नाही. पात्रांमधील नातेसंबंध आता आधीपेक्षा अधिक खोल झाले आहेत आणि त्यांच्या समस्या देखील तितक्याच गुंतागुंतीच्या आहेत. या जगात पुन्हा परत येणं आणि दबावाच्या काळात ही नाती कशी टिकून राहतात किंवा कशी बदलतात हे दाखवणं माझ्यासाठी खूप छान अनुभव होता. मला पूर्ण विश्वास आहे की प्रेक्षकांना या गुंतागुंतीत स्वतःची झलक दिसेल."