आता मला ओळखलंत? 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'ला मिळालेल्या प्रतिसादानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 13:23 IST2025-10-03T13:22:58+5:302025-10-03T13:23:29+5:30
आर्यन खानची पहिलीच प्रतिक्रिया, भावुक होत म्हणाला...

आता मला ओळखलंत? 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'ला मिळालेल्या प्रतिसादानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' ही सीरिज तुफान गाजत आहे. नेटफ्लिक्सवर ही सीरिज प्रदर्शित झाली आहे. आर्यन खान हे नाव २०२१ मध्ये ड्रग्स प्रकरणामुळे चर्चेत आलं होतं. पण आता आर्यनने ही धाँसू सीरिज बनवत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दरम्यान या सर्व प्रक्रियेत आर्यनने एकदाही माध्यमांना मुलाखत दिली नाही. आता सीरिजला मिळालेल्या यशानंतर त्याने स्टेटमेंट देत पहिल्यांदाच भावना व्यक्त केल्या आहेत.
सीरिज बनवताना आल्या अडचणी
आर्यनने आपल्या स्टेटमेंटमध्ये सीरिज बनवताना आलेल्या अडचणींचा उल्लेख केला आहे. तो म्हणतो, "जेव्हा गोष्टी खूप कठीण होत होत्या तेव्हा मला जरजचा डायलॉग आठवायचा. 'हारने मे औक हार मानने मे बहुत फरक होता है'.(हा डायलॉग सीरिजमध्ये अभिनेता रजत बेदीचा आहे) आधी मला वाटलं की मोटिव्हेशन आहे. पण नंतर कळलं की कमी झोप आणि थकव्यामुळे हे होत आहे. पण माझं ध्येय स्पष्ट होतं म्हणूनच मी पुढे जात राहिलो. आज माझी सीरिज बघून लोकांना मिळत असलेला आनंद पाहून मला खूप भावुक वाटतंय. याचसाठी केला होता अट्टाहास, याचसाठी मी स्टोरीटेलिंगकडे वळलो."
सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
सोशल मीडियावरील प्रतिसादाबद्दल आर्यन म्हणाला, "जगाच्या कानाकोपऱ्यातून मिळणारं प्रेम पाहून मी भारावून गेलोय. देशादेशात हा शो ट्रेंडिंगवर आहे. मीम्स, रील्स आणि फॅन थिअरिजवरही शोच्याच गोष्टी आहेत. सुरुवातीला ही माझी गोष्ट होती जी आता सर्व प्रेक्षकांची झाली आहे. घराघरात हा शो पोहोचला हे केवळ नेटफ्लिक्समुळे शक्य झालं आहे. जसं की जरज नम्रपणे म्हणतो, 'आता मला ओळखलंत?'
'बॅड्स ऑफ बॉलिवूड' सीरिजमध्ये बॉबी देओल, लक्ष्य लालवानी, राघव जुयाल, सेहर बम्बा, मोना सिंह, आन्या सिंह, मनोज पाहवा मुख्य भूमिकेत आहेत. तसंच सलमान, शाहरुख, आमिर, राजामौली, इम्रान हाश्मी, अर्शद वारसीसह अनेक कलाकारांचा कॅमिओ आहे.