'तस्करी'च्या सेटवर इमरान कसा वागायचा? अमृता खानविलकरने शेअर केला अनुभव, म्हणाली-"त्यांचा ऑरा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 13:18 IST2026-02-13T13:16:58+5:302026-02-13T13:18:57+5:30

अमृता खानविलकरने सांगितला इमरान हाश्मीसोबत काम करण्याचा अनुभव, म्हणाली-"मुली तर त्यांच्यासाठी ..."

amrita khanvilkar shared her experience of working with emraan hashmi in taskaree the smugglers web series | 'तस्करी'च्या सेटवर इमरान कसा वागायचा? अमृता खानविलकरने शेअर केला अनुभव, म्हणाली-"त्यांचा ऑरा..."

'तस्करी'च्या सेटवर इमरान कसा वागायचा? अमृता खानविलकरने शेअर केला अनुभव, म्हणाली-"त्यांचा ऑरा..."

Amruta Khanvilkar: मराठी चित्रपटसृष्टीतील चंद्रा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. अभिनेत्री अमृता खानविलकरनं केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अमृतानं नाटक, हिंदी व मराठी मालिका तसेच मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये भरीव कामगिरी केली आहे. आता अमृता ओटीटीवर स्थिरावली आहे. सध्या ती  'तस्करीः द स्मगलर्स वेब' या सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये अभिनेत्रीने बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी सोबत स्क्रिन शेअर केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री इम्रानसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.

नुकतीच अमृता खानविलकरने नवशक्तीला  मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने  'तस्करीः द स्मगलर्स वेब' बद्दल अनेक किस्से शेअर केले. त्यादरम्यान, या सीरिजमध्ये इम्रान हाश्मीसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता , याबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी तिने सेटवरच्या आठवणी सांगताना अमृता म्हणाली," खरंतर सीरिजमध्ये इम्रान सर, माझी आणि नंदिशची केमिस्ट्री दिसणं गरजेचं होतं. कारण, त्यात आम्ही एका लेव्हलचे ऑफिसर्स आहोत. त्यामध्ये माझं जे पात्र आहे ते खूप मजा-मस्ती करणार आहे. म्हणजे बॉसला काहीही जाऊन विचारु शकतं,असं ते पात्र आहे. त्यामुळे सेटवर माझा तसा वावर असायचा. ते त्यांना फार आवडायचं."

यापुढे अमृता म्हणाली," पण, एक कलाकार म्हणून ते खूप चांगले आहेत. जर ते सेटवर फ्रेंडली वागले नसते, बोलके नसते तर आमचं कठीण होतं. मला तर त्यांच्याशी काय बोलू, काय संभाषण करू हा प्रश्न पडला असता. पण, त्यांच्यामुळे हे सहज शक्य झालं."

इतक्या मुलींचे फोन आले की... 

चाहत्यांचे किस्से शेअर करत अमृता म्हणाली, "मुली तर त्यांच्यासाठी वेड्या आहेत. मला त्यावेळी इतक्या मुलींचे फोन आले की,त्या सारख्या म्हणायच्या आम्हाला एकदा त्यांना भेटायचंय. शिवाय कामाप्रती निष्ठा असणारा माणूस आहे.अत्यंत हुशार माणूस,भाषेवर त्यांचं असणारं प्रभूत्व हे कमाल आहे. सेटवर येताना ते जो ऑरा घेऊन येतात, त्यांच्यामुळे काम करणं सहज सोपं होऊन जातं." असा खुलासा अभिनेत्रीने केला. 

'तस्करीः द स्मगलर्स वेब' ही वेब सीरिज १४ जानेवारी २०२६ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. सध्या या सीरिजने केवळ भारतातच नाही तर जगभरात धुमाकूळ घातला आहे. रिलीजच्या पहिल्या आठवड्यातच, या वेब सीरिजने जागतिक टॉप १० सीरिजच्या यादीमध्ये स्थान पक्कं करत  इतिहास रचला.शिवाय, पहिल्या आठवड्यातच 'तस्करीः द स्मगलर्स वेब' सीरिजने ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा ओलांडला.

Web Title : 'तस्करी' के सेट पर इमरान के साथ काम करने का अनुभव: अमृता खानविलकर

Web Summary : अमृता खानविलकर ने 'तस्करी' में इमरान हाश्मी के साथ काम करने का अनुभव साझा किया, उनकी व्यावसायिकता, दोस्ताना स्वभाव और सकारात्मक माहौल की प्रशंसा की, जिससे सहयोग आसान हो गया।

Web Title : Amruta Khanvilkar Shares Experience Working with Emraan Hashmi on 'Taskari'

Web Summary : Amruta Khanvilkar shared her experience working with Emraan Hashmi in 'Taskari,' praising his professionalism, friendly nature, and the positive aura he brought to the set, making collaboration easy.