पायऱ्यांवर उतरत असताना जोरात पडली अभिनेत्री, सहकलाकारांनी लगेच सावरलं; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 10:42 IST2025-11-08T10:42:09+5:302025-11-08T10:42:32+5:30
'द फॅमिली मॅन ३'च्या इव्हेंटमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पायऱ्यांवर उतरत असताना जोरात पडली अभिनेत्री, सहकलाकारांनी लगेच सावरलं; व्हिडीओ व्हायरल
लोकप्रिय वेबसीरिज 'द फॅमिली मॅन ३'चा ट्रेलर नुकताच मुंबईत एका मोठ्या इव्हेंटमध्ये लाँच करण्यात आला. या कार्यक्रमाला मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee), प्रियमणी आणि शारिब हाश्मी यांच्यासह संपूर्ण कास्ट उपस्थित होती. मात्र, याच दरम्यान एक छोटीशी घटना घडली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्टेजवरुन उतरताना खाली पडल्याने मनोज वाजपेयींच्या ऑन स्क्रीन लेकीला चांगलाच मार बसला.
नेमकं काय घडलं?
या वेबसीरिजमध्ये मनोज वाजपेयी यांच्या मुलीची, धृतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्लेषा ठाकूर स्टेजवरून खाली उतरत असताना तिचा तोल गेला आणि ती पायऱ्यांवर जोरात पडली. अश्लेषा तिची ऑन-स्क्रीन आई, अभिनेत्री प्रियमणी हिच्यासोबत हातात हात घालून स्टेजवरून खाली उतरत होती. आश्लेषाने हाय हील्स घातल्या होत्या, ज्यामुळे तिचे तोल गेला आणि ती धडपडली. अश्लेषा खाली पडताच प्रियमणी आणि अभिनेता शरीब हाश्मी तिच्या मदतीला पुढे आले. अचानक ही घटना घडल्याने अश्लेषा काहीवेळ पाऱ्यांवरच बसून होती.
अश्लेषाने या इव्हेंटला स्ट्रॅपलेस ब्लॅक ड्रेस परिधान केला होता. हा ड्रेस थोडासा सरकला, जो प्रियमणी आणि इतरांनी लगेच नीट केला, ज्यामुळे मोठी अडचण टळली. पापाराझींनी हा संपूर्ण प्रसंग कॅमेरात कैद केला आणि हा व्हिडिओ लगेचच व्हायरल झाला.
अनेक नेटिझन्सनी आश्लेषाबद्दल चिंता व्यक्त केली आहे, तर काही युजर्सनी 'हाय हील्समध्ये कम्फर्टेबल नसेल, तर त्या कशासाठी घालायच्या?' अशा कमेंट्स करत तिच्या फुटवेअरच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या घटनेनंतर आश्लेषाने स्वतःला सावरलं आणि ती पुन्हा आत्मविश्वासाने कार्यक्रमात सहभागी झाली. 'द फॅमिली मॅन सीझन ३' ही बहुप्रतिक्षित वेब सीरिज २१ नोव्हेंबर २०२५ पासून प्राइम व्हिडिओवर (Prime Video) स्ट्रीम होणार आहे.