बोल्ड दृश्यांचा भडीमार! २४ वर्षांच्या नायकाचा दुप्पट वयाच्या अभिनेत्रीसोबत रोमान्स; 'ही' बहुचर्चित वेबसीरिज पाहिलीत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 16:39 IST2025-11-01T16:28:41+5:302025-11-01T16:39:12+5:30
२४ वर्षांच्या नायकाचा दुप्पट वयाच्या अभिनेत्रीसोबत रोमान्स; 'ही' बहुचर्चित वेबसीरिज पाहिली का?

बोल्ड दृश्यांचा भडीमार! २४ वर्षांच्या नायकाचा दुप्पट वयाच्या अभिनेत्रीसोबत रोमान्स; 'ही' बहुचर्चित वेबसीरिज पाहिलीत का?
A Suitable Boy Webseries: सध्याच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मची लोकप्रियता आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सची संख्या झपाट्याने वाढली आहे. आपल्या देशात दरवर्षी कित्येक चित्रपट आणि सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मात्र, ओटीटी प्रेमींमध्ये काही मोजक्याच सीरिजबद्दल चर्चा होत असते. अशाच एका बहुचर्चित सीरिजबद्दल आपण जाणून घेणार आहोत.ही सीरिज त्यातील बोल्ड सीन्स आणि कथानकामुळे प्रचंड चर्चेत आली होती.
या सीरिजचं नाव 'अ सुटेबल बॉय' आहे. लेखक विक्रम सेठची कादंबरी 'अ सुटेबल बॉय'वर ही सीरिज आधारित आहे.मीरा नायर दिग्दर्शित या सीरिजमध्ये ईशान खट्टरने मान कपूरची भूमिका साकारली होती. यामध्ये तान्या मानिकतला, ईशान खट्टर, शहाना गोस्वामी, माहिरा कक्कर आणि तब्बू हे कलाकार होते. सर्वांनीच दमदार परफॉर्मन्स दिले होते. मात्र ईशान आणि तब्बूच्या त्या किसींग सीनची चांगलीच चर्चा झाली. 'अ सूटेबल बॉय' मध्ये, तब्बू आणि ईशान खट्टर यांच्या पात्रांमध्ये वयाचे मोठं अंतर होते. तरीही, दोघांमध्ये एक सुंदर बॉण्डिंग पाहायला मिळाली. वयाच्या ४८ वर्षी तिनं २४ वर्षाच्या हिरोसोबत इंटिमेट सीन्स दिले होते. या सीरिजमध्ये तब्बूचे अनेक इंटिमेट सीन्स होते. या सीन्सने ओटीटीवर धुमाकूळ घातला होता. तर काही लोकांनी त्यातील दृश्यांवर आक्षेप घेतला होता. २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या या सीरिजची क्रेझ अजूनही कायम आहे.
असं आहे कथानक
'अ सुटेबल बॉय'मध्ये दाखवण्यात आलंय की, कपूर आणि मेहरा कुटुंबाच्या घरातील एका कार्यक्रमामध्ये सईदाबाई ही गाणं म्हणायला येते. याचदरम्यान, सईदाबाई आणि मान यांची पहिल्यांदा भेट होते. या भेटीतच मान तिच्या प्रेमात पडतो. त्यानंतर मान हा सईदाबाईच्या घरी जाण्यास सुरुवात करतो.मात्र, त्यांची ही प्रेमकहाणी कुटुंबियांनी मान्य नसते. त्यानंतर सीरिजमध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडतात.ही सीरिज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. या सीरिजला IMDb वर 6.2 रेटिंग मिळाले आहे.