विद्या बालनचा नवीन सिनेमा पाहा फक्त ९९ रुपयांत! कधी? कुठे? जाणून घ्या ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 01:34 PM2024-04-18T13:34:55+5:302024-04-18T13:36:10+5:30

विद्या बालनच्या आगामी 'दो और दो प्यार' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. हा सिनेमा तुम्हाला फक्त ९९ रुपयांत पाहायला मिळणार आहे. वाचा ही खास ऑफर (vidya balan, pratik gandhi, do aur do pyaar)

Watch Vidya Balan's new movie do aur do pyaar for just 99 rupees know details | विद्या बालनचा नवीन सिनेमा पाहा फक्त ९९ रुपयांत! कधी? कुठे? जाणून घ्या ऑफर

विद्या बालनचा नवीन सिनेमा पाहा फक्त ९९ रुपयांत! कधी? कुठे? जाणून घ्या ऑफर

विद्या बालन ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री.  विद्याला आपण विविध सिनेमांमध्ये बहुरंगी भूमिका साकारताना पाहिलंय. विद्याच्या आगामी सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. हा सिनेमा म्हणजे 'दो और दो प्यार'. विद्याचा हा आगामी सिनेमा उद्या १९ एप्रिलला संपूर्ण भारतात रिलीज होणार आहे. विद्याचे फॅन्स या सिनेमासाठी उत्सुक असतील यात शंका नाही. याच फॅन्ससाठी आनंदाची बातमी. विद्याचा हा सिनेमा तुम्हाला फक्त ९९ रुपयांत पाहायची संधी आहे. वाचा सविस्तर.

उद्या अर्थात १९ एप्रिलला सिनेमा लव्हर डे साजरा होतोय. यानिमित्ताने उद्या विद्या बालनचा 'दो और दो प्यार' सिनेमा तुम्हाला फक्त ९९ रुपयांत पाहायला मिळणार आहे. 'दो और दो प्यार' च्या निर्मात्यांनी ही खास ऑफर प्रेक्षकांना सांगितली आहे. त्यामुळे उद्या भारतातल्या कोणत्याही सिनेमागृहात तुम्हाला 'दो और दो प्यार' सिनेमा फक्त ९९ रुपयांत पाहायला मिळेल. ही ऑफर फक्त उद्यापर्यंत लागू आहे.

'दो और दो प्यार' सिनेमाबद्दल सांगायचं तर.. Applause Entertainment आणि Ellipsis Entertainment production यांनी मिळून सिनेमाची निर्मिती केलीय. विद्या बालन, प्रतीक गांधी, इलियाना डीक्रूज आणि सेंधिल राममूर्थी या कलाकारांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. १९ एप्रिल २०२४ ला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सिनेमाच्या पहिल्याच दिवशी तिकिट ९९ रुपये इतकं स्वस्त असल्याने बॉक्स ऑफीस सिनेमा चांगली कमाई करेल, अशी शक्यता आहे.

 

Web Title: Watch Vidya Balan's new movie do aur do pyaar for just 99 rupees know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.