७५ रुपयांत सिनेमा पाहायचाय? आठवडाभर थांबा; ‘नॅशनल सिनेमा डे’ आता २३ सप्टेंबरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 08:14 IST2022-09-14T08:13:31+5:302022-09-14T08:14:12+5:30

१६ सप्टेंबर रोजी ‘नॅशनल सिनेमा डे’निमित्त अवघ्या ७५ रुपयांत मल्टिप्लेक्स सिनेमागृहांत सिनेमा पाहण्याची ऑफर देण्यात आली होती.

Want to watch a movie for 75 rupees? Wait a week; 'National Cinema Day' is now on 23 September | ७५ रुपयांत सिनेमा पाहायचाय? आठवडाभर थांबा; ‘नॅशनल सिनेमा डे’ आता २३ सप्टेंबरला

७५ रुपयांत सिनेमा पाहायचाय? आठवडाभर थांबा; ‘नॅशनल सिनेमा डे’ आता २३ सप्टेंबरला

मुंबई : ‘नॅशनल सिनेमा डे’निमित्त १६ सप्टेंबर रोजी अवघ्या ७५ रुपयांत सिनेमा पाहण्याची ऑफर सिनेप्रेमींना देण्यात आली होती. मात्र, बॉक्स ऑफिसवर ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट चांगली कामगिरी करत असल्याने हा निर्णय आठवडाभारासाठी पुढे ढकलण्यात आला आहे.

परिणामी ‘नॅशनल सिनेमा डे’ २३ सप्टेंबरला साजरा केला जाणार असून, त्या दिवशी सिनेप्रेमींना ७५ रुपयांत सिनेमा पाहता येणार आहे. 
१६ सप्टेंबर रोजी ‘नॅशनल सिनेमा डे’निमित्त अवघ्या ७५ रुपयांत मल्टिप्लेक्स सिनेमागृहांत सिनेमा पाहण्याची ऑफर देण्यात आली होती. मात्र, ‘ब्रह्मास्त्र’च्या कलेक्शनवर या ऑफरचा परिणाम होऊ नये यासाठी मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने ‘नॅशनल सिनेमा डे’ १६ ऐवजी २३ सप्टेंबरला साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.  ‘ब्रह्मास्त्र’च्या टीमने विनंती केल्यानंतर मल्टिप्लेक्स असोसिएशनने वरीलप्रमाणे निर्णय घेतला.

Web Title: Want to watch a movie for 75 rupees? Wait a week; 'National Cinema Day' is now on 23 September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.