सुपरस्टार विजय सेतुपतीच्या सेटवर दुर्घटना; २० फूट खाली कोसळून स्टंटमॅनचा मृत्यु

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 10:16 AM2022-12-05T10:16:50+5:302022-12-05T10:18:38+5:30

'विदुथलई' या आगामी सिनेमाचे शुटिंग सुरु असताना स्टंटमॅन 'एस सुरेश' यांचे निधन झाले.

vijay-setupati-fil-set-stuntman-Suresh-died-on-the-film-set-of-viduthalai | सुपरस्टार विजय सेतुपतीच्या सेटवर दुर्घटना; २० फूट खाली कोसळून स्टंटमॅनचा मृत्यु

सुपरस्टार विजय सेतुपतीच्या सेटवर दुर्घटना; २० फूट खाली कोसळून स्टंटमॅनचा मृत्यु

googlenewsNext

साऊथचा सुपरस्टार 'विजय सेतुपती'च्या आगामी सिनेमाच्या सेटवर एक दु:खद घटना घडली आहे. 'विदुथलई' या आगामी सिनेमाचे शुटिंग सुरु असताना स्टंटमॅन 'एस सुरेश' यांचे निधन झाले. एका सीन शूट दरम्यान दोरी तुटल्याने २० फूट उंचावरुन एस सुरेश हे सरळ खाली पडले. यामध्ये त्यांचा मृत्यु झाला. (South Movie)

दिग्दर्शक वेत्रिमारन यांची 'विदुथलई' या सिनेमात विजय सेतुपती यांची प्रमुख भुमिका आहे. दरम्यान एका सीनमध्ये स्टंटमॅन सुरेश यांचे शुट होते. दोरीच्या साहाय्याने त्यांना २० फुट उंचावरुन उडी मारायची होती. त्यांनी सेफ्टीसाठी दोरी बांधली होती. मात्र ही दोरी अचानक तुटल्याने ते खाली कोसळले. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केले मात्र तोवर त्यांचा मृत्यु झाला होता.  (S Suresh stuntman)

एस सुरेश हे गेल्या २५ वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्टंटमॅन म्हणून काम करत होते. या दुर्घटनेनंतर शुटिंग थांबवण्यात आल. याप्रकरणा पोलिस आता तपास करत आहेत.

Web Title: vijay-setupati-fil-set-stuntman-Suresh-died-on-the-film-set-of-viduthalai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.