Next

Rasika Sunil-Aditya Bilagi WEDDING | एक गोड फोटो शेअर करत रसिकाने केली लग्नाची घोषणा | Rasika Aditya

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 14:35 IST2021-10-01T14:34:51+5:302021-10-01T14:35:07+5:30

काहीच दिवसांपूर्वी अभिनेत्री रसिका सुनीलने तिचा बॉयफ्रेण्ड आदित्यसोबत लग्नबंधनात अडकणार असल्याची गुड न्यूज चाहत्यांना दिली होती. त्यानंतर रसिका कधी लग्न करणार...रसिका लग्नानंतर परदेशात सेटल होणार का असे एक ना अनेक प्रश्न चाहत्यांनी केले होते. त्यावर आता रसिकाने आदित्यसोबतचा एक गोड फोटो शेअर करत लग्नाची घोषणा केलीये.रसिका याच महिन्यात मुंबईमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे. रसिकाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये रसिका -आदित्यसोबत तिचा पेटही दिसतोय. ज्याने हातात पाटी पकडली आहे. ज्यावर आता माझी ही दोन माणसं आता लग्नबंधनात अडकणार असे लिहले आहे.