Next

गानकोकिळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2016 13:59 IST2016-09-28T07:46:08+5:302016-09-28T13:59:26+5:30

गानकोकिळा लता मंगेशकर यांचा २८ सप्टेंबर रोजी वाढदिवस. लता मंगेशकर यांनी हजारो गाणी गायली. त्यांची शेकडो गाणी लोकप्रिय झाली. परंतू लता मंगेशकर यांना आवडणाºया काही प्रमुख हिंदी गाण्यांची माहिती या ठिकाणी देत आहोत. ही गाणी अजरामर आहेत.

गानकोकिळा लता मंगेशकर यांचा २८ सप्टेंबर रोजी वाढदिवस. लता मंगेशकर यांनी हजारो गाणी गायली. त्यांची शेकडो गाणी लोकप्रिय झाली. परंतू लता मंगेशकर यांना आवडणाºया काही प्रमुख हिंदी गाण्यांची माहिती या ठिकाणी देत आहोत. ही गाणी अजरामर आहेत.पद्मिनी चित्रपटातील बेदर्द तेरे दर्द को सीने से लगाके हे लता मंगेशकर यांच्या आवडत्या गाण्यापैकी एक आहे.रुस्तम सोहराब या चित्रपटातील ए दिलरुबा हे गाणं लताजींना आजही आवडते.सैंय्या चित्रपटातील काली काली रात रे दिल बडा सताए हे सज्जाद हुसेन यांनी संगीतबद्ध केलेले गाणं लताजींच्या आवडत्या गाण्यापैकी एक आहे.तराना चित्रपटातील सीने मे सुलगते है अरमान हे गाणं खूपच लोकप्रिय आहे.अनिल विश्वास यांनी संगीतबद्ध केलेल्या वो दिन कहाँ गए बता हे तराना चित्रपटातील गाणं लताजींच्या आवडीचे आहे.श्याम सुंदर यांनी संगीतबद्ध केलेल्या बाजार या चित्रपटातील साजन की गलियाँ छोड चले हे गाणे आजही लोकांच्या ओठावर आहे.अंदाज चित्रपटातील उठाए जा उनका सितम हे गाणं लताजींच्या आवडत्या गाण्यापैकी एक आहे.अमर चित्रपटातील जाने वाले से मुलाकात हे गाणं लोकांच्या आवडीचे आहे.मुगल-ए-आजम चित्रपटातील नौशाद यांनी संगीतबद्ध केलेले प्यार किया तो डरना क्या हे आॅल टाईम हिट गाणं आहे.वो कौन थी या चित्रपटातील लग जा गले हे गाणं लोकांच्या ओठावर अजूनही रुंजी घालते.जहाँ आरा चित्रपटातील मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेले वो चुप रहे तो मेरे दिल के दाग जलते हैं हे गाणं लताजींच्या आवडीचे आहे.अभिमान चित्रपटातील पिया बिना पिया बिना हे गाणं अजूनही लोकप्रिय आहे.ज्वेल थीफमधील एस. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेले रुला के गया सपना मेरा हे गाणं लताजींना खूप आवडते.कोहरा चित्रपटातील ओ बेकरार दिल हे गाणं आजही लोकांना आवडते.बीस साल बाद या चित्रपटातील हेमंत कुमार यांनी संगीतबद्ध केलेले गाणं आजही लोकप्रिय गाण्यांच्या यादीत अव्वल स्थानी आहे.रझिया सुलतान चित्रपटातील ए दिले नादान हे गाणं लताजींच्या आवडत्या गाण्यापैकी एक आहे.शंकर हुसेन चित्रपटातील खय्याम यांनी संगीतबद्ध केलेले अपने आप रातों मे चिलमने सरकती है, हे गाणे लोकप्रिय आहे.आजाद चित्रपटातील राधा ना बोले हे गाणं लताजींचे आवडते आहे.सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले शोला जो भडके आजही तितकेच लोकप्रिय आहे.चित्रलेखा चित्रपटातील ए री जाने ना दुंगी हे गाणं लोकप्रिय आहे.बहु बेगम या चित्रपटातील रोशन यांनी संगीतबद्ध केलेले दुनिया करे सवाल हे गाणं खूप गाजलं.सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेले परख चित्रपटातील ओ सजना बरखा बहार आई गाणं खूपच लोकप्रिय आहे.हम दोनो चित्रपटातील जयदेव यांनी संगीतबद्ध केलेले अल्लाह तेरो नाम हे गाणं लताजींच्या आवडत्या गाण्यापैकी एक आहे.सरस्वतीचंद्र चित्रपटातील कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेले चंदना सा बदन लोकांना आजही आवडते.लव्ह इन टोकियोमधील सायोनारा हे गाणं आजही तितकेच लोकप्रिय आहे.आरजू चित्रपटातील अजी रुठकर अब कहां जाईयेगा हे आरजू चित्रपटातील शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणं खूप गाजले.मेरे हमदम मेरे दोस्त चित्रपटातील चलो सजना जहाँ तक हे गाणं खूप लोकप्रिय आहे.एक नजर या चित्रपटातील लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणं लताजींच्या आवडत्या गाण्यापैकी एक आहे.अनामिका चित्रपटातील बाहों मे चले आओ हे गाणं आजही लोकप्रिय आहे.कारवाँ चित्रपटातील आर. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणं लताजींच्या आवडत्या गाण्यापैकी एक आहे.राजेश रोशन यांनी ज्युली चित्रपटात संगीतबद्ध केलेले ये राते नई पुरानी हे गाणं लताजींच्या आवडत्या गाण्यापैकी एक आहे.रंग दे बसंती या चित्रपटात ए. आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलेले लुक्का छुपी हे गाणं लताजींचे आवडते आहे.लेकीन चित्रपटातील पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेले सुनिओजी अरज हे गाणं लताजींना खूप आवडते.