Asha bhosle New Song Recording | ८८ व्या वर्षी पुन्हा घुमणार आशा भोसलेंचे सूर | Lokmat Filmy
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 16:07 IST2021-09-07T16:07:12+5:302021-09-07T16:07:49+5:30
एक सदाबहार गायिका म्हणजेच सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले . त्यांच्या आवाजावर संपूर्ण जग फिदा आहे. शास्त्रीय संगीत, भक्तीगीत, भावगीत, गझल आणि लोकगीतांपासून ते पॉप सिंगीगपर्यंत सगळं काही गाणाऱ्या आशाताई सर्वांनाच माहितीयेत. गेली अनेक दशकं रसिकांच्या मनावर आपल्या आवाजाने त्यांनी अधिराज्य गाजवलयं. वयाच्या ८८ व्या वर्षी देखील त्यांनी गाणं काही सोडलेलं नाही. विशेष म्हणजे आपल्याला आता पुन्हा एकदा आशाताईंच्या आवाजातील गाणं ऐकायला मिळणार आहे.