Video: नवाजुद्दीनच्या पांढऱ्या रंगाच्या बंगल्यावरुन कपिलने उडवली खिल्ली, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 11:40 IST2022-04-25T11:38:19+5:302022-04-25T11:40:20+5:30

सोनी एन्टरटेनमेंटच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

Video: Kapil sharma mocks Nawazuddin's white bungalow of mumbai | Video: नवाजुद्दीनच्या पांढऱ्या रंगाच्या बंगल्यावरुन कपिलने उडवली खिल्ली, व्हिडिओ व्हायरल

Video: नवाजुद्दीनच्या पांढऱ्या रंगाच्या बंगल्यावरुन कपिलने उडवली खिल्ली, व्हिडिओ व्हायरल

मुंबई - द कपिश शर्मा शोमध्ये कॉमेडियन आणि या कार्यक्रमाचा होस्ट कपिल शर्मा नेहमीच आलेल्या पाहुण्यांची, उपस्थित ऑडियन्सची आणि सहकलाकारांची खिल्ली उडवत असतो. आता, हिरोपंती 2 चित्रपटाच्या प्रमोशनासाठी आलेल्या नवाजुद्दीन सिद्दिकीची कपिलने खिल्ली उडवली आहे. कपिलच्या शोमध्ये, नवाजुद्दीन सिद्दिकी, टायगर श्रॉप, तारा सुतारिया आणि चित्रपट निर्माते अहमद खान आले होते. या भेटीचा एक सीन सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

सोनी एन्टरटेनमेंटच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये, नवाजुद्दीनच्या नवीन 'नवाब' या बंगल्यावरुन कपिल शर्मा नवाजुद्दीनची खिल्ली उडवत असल्याचे दिसून येते. नवाजने वडिलांच्या नावाने मुंबईत नवाब नावाचा एक बंगला उभारला आहे. या बंगल्याच्या सर्वच भिंती पांढऱ्या रंगाच्या आहेत. या बंगल्यावर कधी कबुतरे उडविण्यास तुम्ही गेला होतात का?, का या बंगल्यात राहून तुम्ही स्वत:ला राष्ट्राध्यक्ष समजता, असा प्रश्न कपिल शर्मा नवाजुद्दीनला विचारतो. 

कपिलने नवाजच्या नवाब या बंगल्यावरुन त्यांची फिरकी घेतली. एखादा माणूस नवीन पांढरा शर्टही शिवतो, तरी तो त्याला घाण लागू नये म्हणून मोठी काळजी घेतो. मात्र, नवाज भाईने तर संपूर्ण बंगलाच पांढऱ्या रंगाचा बनवला आहे. या बंगल्याच्या वरुन तुम्ही कबुतरं उडवता का?, असा सवाल कपिलने केला. तसेच, पांढऱ्या रंगाच्या या बंगल्यात बसल्यावर तुम्ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असल्याचं वाटतं का?, असा मिश्कील सवालही कपिलने केला होता. 

दरम्यान, माझा हा बंगला खूप महाग असून 4-5 चित्रपटांच्या कमाईतून तो साकारला नाही, असे नवाबने म्हटले. तसेच, मंटू हा चित्रपट मी मानधन न घेता केला होता. त्यामुळे, सर्वच चित्रपटातून पैसा मिळतो, असे नाही, असेही नवाजने म्हटले. 
 

Web Title: Video: Kapil sharma mocks Nawazuddin's white bungalow of mumbai