Video goes viral : भटकतंय ओम पुरी यांचं ‘भूत’...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2017 09:47 IST2017-04-18T04:17:43+5:302017-04-18T09:47:43+5:30
ओम पुरी यांचा आत्मा अनेक दिवसांपासून मुंबईच्या रस्त्यांवर भटकत आहे असा दावा पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीने केला आहे.

Video goes viral : भटकतंय ओम पुरी यांचं ‘भूत’...!!
अ िनेते ओम पुरी यांच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित करणा-या पाकिस्तानच्या वृत्तवाहिन्यांनी पुन्हा एकदा आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. ओम पुरी यांचा आत्मा अनेक दिवसांपासून मुंबईच्या रस्त्यांवर भटकत आहे असा दावा पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीने केला आहे. ओम पुरी यांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान मोदींनी पुरी यांचा खून केला असा हास्यास्पद दावाही पाकिस्तानी माध्यमांनी केला होता.
पाकिस्तानच्या एका वृत्त वाहिनीचे न्यूज एंकर आमिर लियाकत यांनी ओम पुरी यांचा आत्मा अनेक दिवसांपासून मुंबईच्या रस्त्यांवर भटकत असल्याचे म्हटले आहे. ओम पुरी यांचा आत्मा काही दिवसांपासून ज्या रहिवाशी इमारतीत ते राहात होते तेथे भटकत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ही ओम पुरी यांचीच सावली असून आपल्या खुन्यांचा म्हणजे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा ती सावली शोध घेत असल्याचे लियाकत म्हणाले.
ALSO READ : ओम पुरी यांच्या मृत्यूमागे मोदींचा हात?
हा व्हिडीओ भारतातही चचेर्चा विषय बनला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानी मीडियाने यामध्ये भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनाही ओढण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडीओ पाहून तो जुना असल्याचे लगेच लक्षात येते, शिवाय व्हिडीओमध्ये जे ठिकाण ओम पुरींची सोसायटी म्हणून सांगितले, जातेय तेही वेगळ आहे.
कसदार अभिनयाने रुपेरी पडद्यावर दीर्घकाळ आपली छाप उमटविणारे ओम पुरी यांचे गत ६ जानेवारीला हृदयविकाराने मुंबईतील राहत्या घरी निधन झाले होते. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी नंदिता आणि मुलगा ईशान असा परिवार आहे.