विदर्भातील ‘विवान’ हॉलिवूडमध्ये
By Admin | Updated: April 11, 2016 00:53 IST2016-04-11T00:53:31+5:302016-04-11T00:53:31+5:30
व्यवसायाने अभियंता असलेल्या आणि हॉलीवूड चित्रपट दिग्दर्शकाला आपल्या अभिनय कौशल्याने प्रभावित करणाऱ्या विवान ऊर्फ विवेक तिवारीनेआवडीच्या क्षेत्रात परिश्रम व सातत्याने

विदर्भातील ‘विवान’ हॉलिवूडमध्ये
व्यवसायाने अभियंता असलेल्या आणि हॉलीवूड चित्रपट दिग्दर्शकाला आपल्या अभिनय कौशल्याने प्रभावित करणाऱ्या विवान ऊर्फ विवेक तिवारीनेआवडीच्या क्षेत्रात परिश्रम व सातत्याने प्रयत्न केल्यास यश हमखास मिळवता येते, हे दाखवून दिले आहे.
विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील रहिवासी असलेल्या विवानचे आजोबा वरठी येथे रेल्वेत नोकरीवर होते. वडील अनिल तिवारी हे सनफ्लॅग कंपनीत कार्यरत असून आई गृहिणी आहे. घरात अभिनय क्षेत्रात कुणीही नाही. शाळेत असतापासूनच त्याला अभिनयाची आवड होती. या छंदाने आज त्याला थेट हॉलीवूड चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.
‘सोलर इक्लिप्स, डेफ्थ आॅफ डार्कनेस’ या चित्रपटात तो काम करीत आहे. यात विवानला पोलीस निरीक्षक ओंकारची भूमिका मिळाली आहे. अल्जेरीया येथील रहिवासी व हॉलीवूड दिग्दर्शक करीम ट्रेडिया यांच्या मार्गदर्शनात चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. यात बॉलीवुडचे प्रख्यात अभिनेता ओमपुरी, नसरूद्दीन शहा, अवतार गिल, अनंत महादेवन यांची प्रमुख भुमिका आहे.