'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्याची हिंदी मालिकेत वर्णी, 'माटी से बंधी डोर'मध्ये दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 03:03 PM2024-05-09T15:03:27+5:302024-05-09T15:04:15+5:30

प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची हिंदी मालिकेत एन्ट्री, पाहा प्रोमो

tuzyat jeev rangala fame actor amol naik to play imprtant role in maati se bandhi dor hindi serial | 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्याची हिंदी मालिकेत वर्णी, 'माटी से बंधी डोर'मध्ये दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्याची हिंदी मालिकेत वर्णी, 'माटी से बंधी डोर'मध्ये दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

छोट्या पडद्यावरील अनेक गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे 'तुझ्यात जीव रंगला'. या मालिकेतील राणादा-पाठकबाईंची जोडी लोकप्रिय ठरली होती. या मालिकेत राणादाचा मित्र बरकतची भूमिका साकारून अभिनेता अमोल नाईक घराघरात पोहोचला. 'तुझ्यात जीव रंगला'नंतर अनेक मालिकांमध्ये अमोल महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. आता अमोलची हिंदी मालिकेत वर्णी लागली आहे. 

स्टार प्लस वाहिनीवरील 'माटी से बंधी डोर' या मालिकेत अमोल झळकणार आहे. या मालिकेतून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे. 'माटी से बंधी डोर' चा प्रोमो शेअर करत त्याने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. या मालिकेत तो महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. "तुमच्या सर्वाच्या आशीर्वादाने स्टारप्लसवरील नवीन सुरु होत असलेल्या 'माटी से बंधी डोर' या मालिकेत एका वेगळ्या भूमिकेत तुम्हा रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तुमची साथ,प्रेम,आशिर्वाद माझ्या व माझ्या टीम सोबत कायम असते तशीच राहूदे...गणपती बाप्पा मोरया! श्रीस्वामी समर्थ!", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

 'माटी से बंधी डोर' मालिकेत मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवे मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या मालिकेत तिच्यासह बिग बॉस फेम अभिनेता अंकित गुप्ताही मुख्य भूमिकेत आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: tuzyat jeev rangala fame actor amol naik to play imprtant role in maati se bandhi dor hindi serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.