'टाइमपास' फेम अभिनेत्याने घेतलं स्वप्नातलं हक्काचं घर, म्हणाला- "ही फक्त वास्तू नाही तर..."

By कोमल खांबे | Updated: October 30, 2025 11:19 IST2025-10-30T11:19:05+5:302025-10-30T11:19:51+5:30

'टाइमपास' फेम अभिनेत्याने मुंबईच्या जवळच नवीन घर खरेदी केली आहे. आपल्या या स्वप्नातल्या घरात अभिनेत्याने नुकताच गृहप्रवेशही केला आहे. सोशल मीडियावरून ही खूशखबर अभिनेत्याने चाहत्यांना दिली आहे. 

timepass fame actor jayesh chavan buys new home in panvel | 'टाइमपास' फेम अभिनेत्याने घेतलं स्वप्नातलं हक्काचं घर, म्हणाला- "ही फक्त वास्तू नाही तर..."

'टाइमपास' फेम अभिनेत्याने घेतलं स्वप्नातलं हक्काचं घर, म्हणाला- "ही फक्त वास्तू नाही तर..."

स्वत:चं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. यंदाच्या दिवाळीत काही सेलिब्रिटींनी त्यांचं घराचं हे स्वप्न पूर्ण केलं. एका मराठी अभिनेत्यानेही नुकतंच त्याचं ड्रीम होम खरेदी केलं आहे. 'टाइमपास' फेम अभिनेत्याने मुंबईच्या जवळच नवीन घर खरेदी केली आहे. आपल्या या स्वप्नातल्या घरात अभिनेत्याने नुकताच गृहप्रवेशही केला आहे. सोशल मीडियावरून ही खूशखबर अभिनेत्याने चाहत्यांना दिली आहे. 

'टाइमपास' फेम अभिनेता जयेश चव्हाण याने मुंबईच्या जवळ असलेल्या पनवलेमधील कोणार्क रिव्हर सिटीमध्ये त्याच्या स्वप्नातलं घर घेतलं आहे. गृहप्रवेशाचा व्हिडीओ त्याने शेअर केला आहे. या व्हिडीओत अभिनेत्याच्या घराची झलकही पाहायला मिळत आहे. "ही वास्तू नाही...आमच्या स्वप्नांचा पहिला Take आहे", असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं आहे. त्याच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. 


जयेशने टाइमपासमध्ये दगडू म्हणजेत प्रथमेश परबचा मित्र मलेरिया दादूसची भूमिका साकारली होती. जयेश सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो. त्याचा स्वत:चा 'गोल्डन एरा' नावाचा स्टुडिओ आहे. सोशल मीडियावरुन तो चाहत्यांना अपडेट्स देत असतो. 

Web Title: timepass fame actor jayesh chavan buys new home in panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.