कपिल शर्माच्या गुत्थीवर दूध विकायची वेळ? सुनिलचा फोटो पाहून चाहते रिएक्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 16:19 IST2023-01-09T16:17:06+5:302023-01-09T16:19:05+5:30

द कपिल शर्मा शो या कॉमेडी कार्यक्रमात सुनिल ग्रोव्हरचं गुत्थी हे पात्र अतिशय फेसम झालं होतं.

Time to sell milk on Comedian Sunil Grover? Fans are emotional after seeing the photo of the actor | कपिल शर्माच्या गुत्थीवर दूध विकायची वेळ? सुनिलचा फोटो पाहून चाहते रिएक्ट

कपिल शर्माच्या गुत्थीवर दूध विकायची वेळ? सुनिलचा फोटो पाहून चाहते रिएक्ट

कॉमेडियन कपिल शर्माच्या द कपिल शर्मा शोमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता सुनिल ग्रोव्हर चक्क दूध विकताना पाहायला मिळाला. सोशल मीडियावर सुनिलने एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये, तो आपल्या बाईकला दुधाचे कँड अडकवून गल्लोगल्लीत दूध वाटताना दिसून येत आहे. अभिनेता सुनिलचा हा फोटो पाहून चाहतेही संभ्रमावस्थेत पडले आहेत. कारण, हा फोटो कुठल्या तरी शुटींमधील सीन आहे, की खरंच सुनिल ग्रोव्हर दूध विक्रीचा व्यवसाय करायला लागला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

द कपिल शर्मा शो या कॉमेडी कार्यक्रमात सुनिल ग्रोव्हरचं गुत्थी हे पात्र अतिशय फेसम झालं होतं. आपल्या प्रसंगावधान कॉमेडीमुळे सुनिल ग्रोव्हर चांगलाच लोकप्रियही झाला. त्यामुळे, अर्थातच सोशल मीडियावरही त्याचे चाहते, फॉलोअर्स वाढले आहेत. त्यामुळे, सुनिलच्या सोशल मीडिया अकाऊंवर चाहत्यांचे बारीक लक्ष असते. सुनिलने नुकतेच इंस्ट्राग्राम अकाऊंटवरुन बाईकवरील एक फोटो शेअर केला आहे. त्याच्या बाईकला दुधाच्या कँडा लटकवल्याच्या दिसून येतात. 

सुनिलच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या असून काहींना त्याला ट्रोल केलंय. तर, काहींना त्याच्या या फोटोचं कौतुक करत, कोई भी धंदा छोटो या बडा नही होता.. असा उपदेशही दिला आहे. सुनिलच्या या फोटोला ४ लाख १३ हजार लाईक्स असून हजारो कमेंट आहेत. त्यामध्ये, एकाने दूध नागिणीला पाज, असा सल्ला दिलाय. तर, दुधात पाणी किती मिसळलंय, असा प्रश्नही एका युजर्संने विचारला आहे. 

दरम्यान, सुनिलने टाकलेला हा फोटो शुटींगमधील सीन आहे की खरा, याबाबत खात्रीशीर माहिती नाही. तरीही, हा शुटींगमधील सीन असावा, असाही अंदाज बहुतांश चाहत्यांनी वर्तवला आहे. 
 

Web Title: Time to sell milk on Comedian Sunil Grover? Fans are emotional after seeing the photo of the actor