'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 11:25 IST2025-12-19T11:24:44+5:302025-12-19T11:25:38+5:30
3 Idiots Sequel: '३ इडियट्स' या चित्रपटाच्या सीक्वलच्या टायटलवरून पडदा उठला आहे. या चित्रपटात आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी यांच्यासोबत आणखी एक मुख्य अभिनेता झळकण्याची शक्यता आहे.

'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
आमिर खानच्या '३ इडियट्स' या क्लासिक कल्ट कॉमेडी चित्रपटाचा सीक्वल आता कन्फर्म झाला आहे. आमिर खान आणि राजकुमार हिराणी पुन्हा एकदा या सीक्वलवर एकत्र काम करण्याची तयारी करत आहेत. २०२६ मध्ये या चित्रपटाचे काम सुरू होईल. मात्र या चित्रपटाचे तात्पुरते शीर्षक समोर आले असून यामध्ये एका नवीन मुख्य अभिनेत्याची एन्ट्री होऊ शकते, अशी चर्चा आहे.
'पिंकविला'ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू असून याचे तात्पुरते शीर्षक '४ इडियट्स' असे ठेवण्यात आले आहे. अर्थात, हे नाव भविष्यात बदलले जाऊ शकते. निर्माते या प्रसिद्ध फ्रेंचायझीला मूळ त्रिकुटाच्या पलीकडे नेण्यासाठी एका 'सुपरस्टार'च्या शोधात आहेत. हा चौथा इडियट कोणी मोठा अभिनेता असू शकतो.
कथानकात काय असेल नाविन्य?
'३ इडियट्स'च्या सीक्वलबद्दल पुढे सांगण्यात आले आहे की, लेखन प्रक्रिया सुरू असून हा भाग पहिल्या भागापेक्षाही मोठा आणि सरस कसा होईल, यावर टीम लक्ष केंद्रित करत आहे. पहिल्या भागाची गोष्ट जिथे संपली होती, तिथूनच हा प्रवास पुढे सुरू होईल. मात्र, हा केवळ पुढचा भाग नसेल, तर त्यात नवीन घटक जोडले जातील, जेणेकरून चौथ्या मुख्य पात्राची भूमिका स्पष्ट होईल.
'३ इडियट्स'बद्दल
२००९ मध्ये प्रदर्शित झालेला '३ इडियट्स' हा बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा टप्पा पार करणारा पहिला भारतीय चित्रपट होता. यामध्ये आमिर खान, शर्मन जोशी आणि आर. माधवन यांच्यासोबत करीना कपूर आणि बोमन इराणी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.
आमिर खानचे आगामी प्रोजेक्ट
आमिर खान सध्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहे. तो 'लाहोर १९४७' आणि त्याचा मुलगा जुनैद खानचा चित्रपट 'मेरे रहो'ची निर्मिती करत आहे. यानंतर तो त्याच्या 'महाभारत' या ड्रीम प्रोजेक्टवरही काम करणार आहे.