अजय देवगनच्या 'सिंघम अगेन'मध्ये 'या' दाक्षिणात्य अभिनेत्याची एन्ट्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 12:58 PM2024-05-21T12:58:33+5:302024-05-21T13:01:27+5:30

आता या चित्रपटाबाबत एक मोठं अपडेट समोर आलं आहे.

Telugu actor Ajay makes Bollywood debut in 'Singham Again' directed by Rohit Shetty | अजय देवगनच्या 'सिंघम अगेन'मध्ये 'या' दाक्षिणात्य अभिनेत्याची एन्ट्री!

अजय देवगनच्या 'सिंघम अगेन'मध्ये 'या' दाक्षिणात्य अभिनेत्याची एन्ट्री!

रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) कॉप युनिवर्समधील बहुप्रतिक्षित 'सिंघम अगेन' (Singham ) चित्रपट सध्या चर्चेत आहेत. तगडी स्टारकास्ट असलेला सिंघम अगेन (Singham Again) चित्रपटाची सध्या शूटींग सरु आहे. अजय देवगणचा चित्रपट 'सिंघम अगेन' हा 2024 च्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. 'सिंघम अगेन' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यातच आता या चित्रपटाबाबत एक मोठं अपडेट समोर आलं आहे. ज्यामुळे चाहत्यांची उत्कंठा द्विगुणित होणार आहे.

'सिंघम अगेन' या चित्रपटात एका लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. अजय देवगणच्या चित्रपटात कोणता साऊथ अभिनेता दिसणार आहे. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अजय देवगण हा दाक्षिणात्य अभिनेत्यासोबत दिसून येत आहे.  या सिनेमातून दाक्षिणात्य अभिनेता 'सिंघम अगेन' बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा अभिनेता तेलुगु स्टार अजय आहे. मात्र, अद्याप अभिनेत्याच्या भुमिकेबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

'सिंघम अगेन' 2011 साली आलेल्या सिंघम फ्रेंचायझीचा तिसरा चित्रपट आहे. 2011 सिंघम रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधील पहिला चित्रपट होता. त्यानंतर रोहित शेट्टीने सिंघमचा सीक्वेल 'सिंघम रिटर्न' आणला. आता 'सिंघम अगेन' या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. विशेष म्हणजे हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आहे.


 

Web Title: Telugu actor Ajay makes Bollywood debut in 'Singham Again' directed by Rohit Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.