बाबो ! सारेगमप लिटील चॅम्प्सचा नवा सिझन, स्पर्धक झाले ज्युरी; जाणून घ्या आयडिया लय भारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 16:08 IST2021-04-05T17:54:50+5:302021-04-06T16:08:30+5:30
सारेगमप लिटील चॅम्पस हा म्युझिकल रिएलिटी शो लवकरच स्मॉल स्क्रीनवर सुरू होतोय.

बाबो ! सारेगमप लिटील चॅम्प्सचा नवा सिझन, स्पर्धक झाले ज्युरी; जाणून घ्या आयडिया लय भारी
सारेगमप लिटील चॅम्पस हा म्युझिकल रिएलिटी शो लवकरच स्मॉल स्क्रीनवर सुरू होतोय आणि खास बात म्हणजे मृग्धा वैश्यंपायन, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत, कार्तिक गायकवाड या लिटिल चॅम्पसनी एकेकाळी स्पर्धक म्हणून हा मंच दणाणून सोडला होता आणि आता हेच स्पर्धक यावेळीच्या सिझनमध्ये ज्युरी म्हणून आपल्या भेटीला येतायत...तर या सिझनच सूत्रसंचालन मृण्मयी देशपांडे करणार अशी चर्चा आहे..
गाईन गीत सुरेल नवे अशी साद घालत सप्तसुरांची उधळणारे संगीतातले पंचमहाभूत म्हणजे रोहित राऊत, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैश्यंपायन ....या लिटील चॅम्पसने आपल्या जादुई सुरांनी सुरेल सांगीतिक मैफल घरबसल्या रसिकांना दिली होती...सारेगमप लिटील चॅम्पसने खरोखर हा सगळ्यांना एक वेगळी ओळख मिळवून दिली...त्यांचे कोवळे सप्तसूर कानी पडणं हा जणू मणिकांचन योग.....आर्या आंबेकरच्या गाण्याचं वैविध्य, मुग्धाचा सुरेल अवखळपणा, प्रथमेशचं शास्त्रीय गायक, रोहित राहऊतची उडती गाणं ही प्रत्येकाची वेगळी खासियत. या सीझनची खासियत म्हणजे यात मुग्धा, आर्या कार्तिकी, प्रथमेश, रोहित हे ज्युरीच्या भूमिकेत दिसणार आहेत.