‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ची बयो बाई फेमस झाली...! ही आज्जी आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 08:00 IST2021-10-03T08:00:00+5:302021-10-03T08:00:02+5:30

Tujhya Majhya Sansarala Ani Kay Hava : ही बयो आज्जी फार थोड्याच दिवसांत इतकी फेमस झालीये की, आताश: सगळे तिला बयो आजी याच नावानेच हाक मारू लागले आहेत.

Zee Marathi Serial Tujhya Majhya Sansarala Ani Kay Hava know about bayo aji aka Surekha Lahamage Sharma In | ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ची बयो बाई फेमस झाली...! ही आज्जी आहे तरी कोण?

‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ची बयो बाई फेमस झाली...! ही आज्जी आहे तरी कोण?

ठळक मुद्दे‘ तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित आहेत. नाती कशी जपावी, आपल्या माणसांवर कसं प्रेम करावं, हा संदेश या मालिकेतून देण्यात आला आहे.

‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ (Tujhya Majhya Sansarala Ani Kay Hava) ही मालिका सुरू झाली आणि अल्पावधीत लोकप्रिय झाली.  राणा दा अर्थात तुमचा आमचा लाडका हार्दिक जोशी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला.  अभिनेत्री अमृता पवारही या मालिकेच्या निमित्ताने चर्चेत आली. शिवाय मालिकेतील बयो आजीही घरातील एका सदस्यासारखी प्रेक्षकांसोबत रूळली.  ‘ तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ मालिकेत बयो आजीची भूमिका अभिनेत्री सुरेखा लहामगे- शर्मा यांनी साकारली आहे. ही बयो आजी फार थोड्याच दिवसांत इतकी फेमस झालीये की, आताश: सगळे तिला बयो आजी याच नावानेच हाक मारू लागले आहेत.

 अलीकडे एका मुलाखतीत बयो आजी आपल्या भूमिकेबद्दल भरभरून बोलल्या. बयो आजीची व्यक्तिरेखा खूप गाजतेय. प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतोय? या प्रश्नाला त्यांनी मनमोकळेपणानं उत्तर दिलं.  ‘आजकाल कोणी मला फोन केला किंवा मला भेटलं तर ते मला बयो आजी म्हणूनच बोलावतात. माझं नाव सुरेखा आहे हे सगळे विसरून गेले आहेत. आता माझी बयो आजी हीच ओळख बनली आहे. मी या व्यक्तिरेखेच्या प्रेमात आहे आणि ती साकारायला खूप मजा येतेय,’ असे त्या म्हणाल्या.श
मला बºयाच लोकांनी सांगितलं की, रात्री 9 वाजले की आम्ही आधी टीव्हीसमोर येऊन बसतो आणि मालिका बघतो. मालिकेचं कथानक प्रेक्षकांना प्रचंड आवडलं आहे, असंही त्या म्हणाल्या.

 शूटिंग सुरु होऊन काहीच दिवस झाले आहेत पण अगदी थोड्याच दिवसात आम्हा सगळ्यांची गट्टी जमली आहे. त्यामुळे आता कुठे धमाल मस्तीला सुरुवात झाली आहे, त्यामुळे इथून पुढे किस्से हळू हळू रंगतील, असंही त्या म्हणाल्या.
‘ तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित आहेत. नाती कशी जपावी, आपल्या माणसांवर कसं प्रेम करावं, हा संदेश या मालिकेतून देण्यात आला आहे.

Web Title: Zee Marathi Serial Tujhya Majhya Sansarala Ani Kay Hava know about bayo aji aka Surekha Lahamage Sharma In