अरेच्च्या नव्यानेच सुरू झालेली झी मराठीवरील ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, काय आहे कारण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 13:29 IST2021-12-09T13:15:45+5:302021-12-09T13:29:29+5:30
झी मराठी (Zee Marathi)वरील प्रत्येक मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे.

अरेच्च्या नव्यानेच सुरू झालेली झी मराठीवरील ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, काय आहे कारण?
झी मराठी (Zee Marathi)वरील प्रत्येक मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे. झी मराठीवर (Zee Marathi) अलीकडेच अनेक मालिका सुरू आहेत. पण मालिका आता अखेरच्या टप्प्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे लवकरच एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 'ती परत आलीय' मालिका ‘ काहीच महिन्यांपूर्वी सुरू झाली होती. पण आता मालिका बंद होणार असल्याचं समोर येत आहे. 18 डिसेंबरला ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याजागी 19 डिसेंबरपासून 'देवमाणूस 2' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
देवमाणूस-२ मालिकेचा काही दिवसांपूर्वी प्रोमो झी मराठी वाहिनीनं प्रदर्शित केला आहे. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याच्या अभिनयाचं देखील प्रचंड कौतुक झालं. त्याच्या अभिनयाने त्याने तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि 'देवमाणूस'मधील भूमिकेने त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली. दुसऱ्या भागातही किरण गायकवाड मुख्य भूमिकेत असणार आहे. बाबू, सरू आजी, टोण्या, डिम्पी, वंदी आत्या, नाम्या, बजा ही पात्रं नव्या मालिकेतही पाहायला मिळणार का हे पाहणं देखील उत्सुकतेचं असणार आहे. कारण यातील कलाकारांची नाव अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आलेली आहे.