Mazhi Tuzhi Reshimgaath : नेहा व यशचा रोमॅन्टिक सीन असा झाला शूट, पाहा पडद्यामागचा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 15:42 IST2022-06-29T15:39:37+5:302022-06-29T15:42:10+5:30
Mazhi Tuzhi Reshimgaath : यश आणि नेहाच्या आयुष्यातील अनेक रोमॅन्टिक क्षण मालिकेत पाहायला मिळत आहेत. हे रोमॅन्टिक सीन्स कसे शूट होतात? हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असणारच. तर आता त्याचा एक BTS व्हिडीओ समोर आला आहे.

Mazhi Tuzhi Reshimgaath : नेहा व यशचा रोमॅन्टिक सीन असा झाला शूट, पाहा पडद्यामागचा व्हिडीओ
झी मराठीवरील (Zee Marathi) ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazhi Tuzhi Reshimgaath) ही मालिका सध्या एका रोमॅन्टिक वळणावर आली आहे. होय, मालिकेत यश आणि नेहा ( Yash-Neha ) यांचं नुकतंच लग्न झालं. नव्या नवराईचं थाटात स्वागत झालं. आता सुरू झालाये तो नवा संसार. आता नेहा व यश यांचं नातं हळूहळू फुलतांना दिसतंय. अधिक घट्ट होताना दिसतेय. यश आणि नेहाच्या आयुष्यातील अनेक रोमॅन्टिक क्षण मालिकेत पाहायला मिळत आहेत. हे रोमॅन्टिक सीन्स कसे शूट होतात? हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असणारच. तर आता त्याचा एक बीटीएस व्हिडीओ समोर आला आहे.
नेहाने अर्थात प्रार्थना बेहरेने (Prarthana Behere) हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिच्या व श्रेयस तळपदे (Shreyas Talpade ) यांचा एक रोमॅन्टिक सीक्वेन्स शूट होताना दिसतोय. ‘शूटींग फन’ अशी कॅप्शन देत प्रार्थनाने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. गॅस चालू करा ना, अशी मजेशीर कमेंट एका युजरने केली आहे. ऑनस्क्रीन तुमची जोडी खूप छान दिसते, अशा शब्दांत काही चाहत्यांनी प्रार्थना व श्रेयसचं कौतुक केलं आहे.
दरम्यान मालिकेत आता नेहाच्या पहिल्या नवऱ्याची एंट्री झाली आहे. आणि त्याने मालिकेत ड्रायव्हरच्या वेषात चौधरी पॅलेस मध्ये एंट्री घेतली आहे. सिम्मी काकूंना देखील नेहाचा भूतकाळ ठाऊक आहे. त्यामुळे सिम्मी काकू आणि नेहाचा पहिला नवरा हे दोघे मिळून नेहाला त्रास देताना दिसणार आहेत. आता पुढे नेहा आणि यशच्या सुखी संसारात तिच्या पहिल्या नवऱ्याच्या एन्ट्रीनंतर काय घडणार,हे पाहणं इंटरेस्टिंंग असणार आहे.