Devmanus 2 : ‘देवमाणूस 2’मध्ये नवा ट्विस्ट, जामकरांची बायको बनून येतेय ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 17:19 IST2022-07-05T17:17:55+5:302022-07-05T17:19:16+5:30

Devmanus 2 : होय, ‘देवमाणूस 2’मध्ये एका नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे. आता मालिकेत मार्तंड जामकरच्या बायकोनं एन्ट्री घेतली आहे.

zee marathi chala hava yeu dya fame snehal shidam entry in devmanus 2 | Devmanus 2 : ‘देवमाणूस 2’मध्ये नवा ट्विस्ट, जामकरांची बायको बनून येतेय ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्री 

Devmanus 2 : ‘देवमाणूस 2’मध्ये नवा ट्विस्ट, जामकरांची बायको बनून येतेय ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्री 

‘देवमाणूस’ ही मालिका तुफान गाजली होती. मालिका इतकी लोकप्रिय झाली होती की लगेच याचा दुसरा सीझन आला. अर्थात दुसऱ्या सीझननं प्रेक्षकांची निराशा केली. पहिल्या सीझन इतका हा सीझन गाजताना दिसला नाही. पण अधुनमधून मालिकेची चर्चा मात्र होत असते. सध्या चर्चा आहे ती ‘देवमाणूस 2’ ( Devmanus 2)  या मालिकेतील नव्या पात्राची. होय, ‘देवमाणूस 2’मध्ये एका नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे. आता मालिकेत मार्तंड जामकर यांच्या बायकोनं एन्ट्री घेतली आहे.

अभिनेते मिलिंद शिंदे मालिकेत मार्तंड जामकर या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहेत. त्यांच्या एन्ट्रीनंतर ‘देवमाणूस 2’ नव्यानं चर्चेत आली आहे. आता याच जामकरांची पत्नी आणि त्याअनुषंगाने एक नवा ट्रॅक मालिकेत बघायला मिळणार आहे.  

मार्तंड जामकर याच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री स्नेहल शिदम ( Snehal Shidam) साकारत आहे. नुकतीच तिची मालिकेत एन्ट्री झाल्याचं प्रेक्षकांना पाहिलंय. 'चला हवा येऊ द्या'ची ब्लॅक ब्युटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्नेहलच्या एन्ट्रीनं मालिकेत नेमका काय ट्वीस्ट येणार हे पाहणं रंजक ठरेल.

मालिकेत स्नेहल एंट्री करणार असल्यानं ती ‘चला हवा येऊ द्या’मधून ब्रेक घेणार का? असा प्रश्न काही चाहत्यांना पडला आहे. येत्या दिवसांत त्याचंही उत्तर मिळेल. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामधून शितल महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. आता ‘देवमाणूस 2’मध्ये ती काय रंगत आणते, ते बघूच.

 दरम्यान  ‘देवमाणूस 2’ ही मालिका लवकरच निरोप घेणार अशीही चर्चा सुरू झाली आहे. सध्या सुरू असलेलं कथानक बघता, मालिकेचा शेवट जवळ आल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याआधीही अशा चर्चा रंगल्या. पण ‘देवमाणूस 2’ अद्यापही सुरू आहे.

Web Title: zee marathi chala hava yeu dya fame snehal shidam entry in devmanus 2