'बिग बॉस १३' मध्ये दिसणार ‘धाकड गर्ल’?, झायरा वसिमला मिळाली १.२ कोटीची ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 13:13 IST2019-07-08T13:09:32+5:302019-07-08T13:13:25+5:30

झायराचा ‘स्काय इज पिंक’ हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय. त्याआधीच तिने बॉलिवूडमधून संन्यास घेत असल्याचे जाहिर केले.

Zaira waseem to enter in bigg boss 13 house, she has been offered 1.2 crore | 'बिग बॉस १३' मध्ये दिसणार ‘धाकड गर्ल’?, झायरा वसिमला मिळाली १.२ कोटीची ऑफर

'बिग बॉस १३' मध्ये दिसणार ‘धाकड गर्ल’?, झायरा वसिमला मिळाली १.२ कोटीची ऑफर

ठळक मुद्दे झायरा बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यास बिग बॉसचा टीआरपी वाढेल. काही दिवसांपूर्वीच झायराने चित्रपटसृष्टीला अलविदा केला आहे. केवळ पाच वर्षांच्या करिअरमध्ये झायराने बॉलिवूडमध्ये मोठा पल्ला गाठला होता.

'बिग बॉस १३' ची तयारी सुरू झालीय. या सीझनमध्ये कोण कोण. स्पर्धक असणार याबाबत तर्कवितर्क आणि चर्चा सुरू झाल्यात. यांत एक नाव समोर येत आहे. ते नाव म्हणजे झायरा वसिम. सोशल मीडियावरील चर्चेनुसार दंगल गर्ल झायरा हिला बिग बॉस १३मध्ये सहभागी होण्याची ऑफर मिळाली आहे. त्यासाठी तिला १.२ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र झायराने ही ऑफर नाकारली आहे. काही दिवसांपूर्वीच झायराने चित्रपटसृष्टीला अलविदा केला आहे. अशात झायरा बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यास बिग बॉसचा टीआरपी वाढेल असा निर्मात्यांना विश्वास होता. मात्र धाकड गर्लनं ही ऑफर नाकारली आहे. 

‘दंगल’ हा आमिर खानसारख्या सुपरस्टारसोबत पहिलाच चित्रपट आणि या पहिल्याच चित्रपटाने मिळवून दिलेली लोकप्रियता...असा सगळा झायरा वसीमचा प्रवास सुुरू होता. केवळ पाच वर्षांच्या करिअरमध्ये झायराने बॉलिवूडमध्ये मोठा पल्ला गाठला होता.फार कमी वयात झायराने अनेक पुरस्कार जिंकले.२०१६ साली या सिनेमासाठी झायराला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या चित्रपटानंतर पुढच्याच वर्षी ‘सीक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटात झायरा झळकली होती. या सिनेमासाठीही तिला फिल्मफेअरचा बेस्ट अ‍ॅक्ट्रेस क्रिटिक्स हा पुरस्कार मिळाला होता. सोशल मीडियावरही ती अ‍ॅक्टिव्ह होती.

झायराचा ‘स्काय इज पिंक’ हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय. त्याआधीच तिने बॉलिवूडमधून संन्यास घेत असल्याचे जाहिर केले. या चित्रपटात ती मोटिवेशन स्पीकर आयशा चौधरीची भूमिका साकारताना दिसणार आहे. यात फरहान अख्तर व प्रियंका चोप्रा लीड भूमिकेत आहेत.

Web Title: Zaira waseem to enter in bigg boss 13 house, she has been offered 1.2 crore