"तिने आमचं घर तोडलं असं लोक म्हणाले, पण...", RJ महावशसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलला युजवेंद्र चहल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 10:05 IST2025-08-01T10:05:26+5:302025-08-01T10:05:56+5:30

धनश्री वर्माला घटस्फोट दिल्यानंतर चहल RJ महावशला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. काही ठिकाणी त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. त्यामुळे ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यावर आता पहिल्यांदाच युजवेंद्र चहलने भाष्य केलं आहे.

yuzvendra chahal talk about relationship with rj mahavash said people tag her housebreaker | "तिने आमचं घर तोडलं असं लोक म्हणाले, पण...", RJ महावशसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलला युजवेंद्र चहल

"तिने आमचं घर तोडलं असं लोक म्हणाले, पण...", RJ महावशसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलला युजवेंद्र चहल

भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल त्याच्या पर्सनल लाइफमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. धनश्री वर्माला घटस्फोट दिल्यानंतर चहल RJ महावशला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यांचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही ठिकाणी त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. त्यामुळे ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यावर आता पहिल्यांदाच युजवेंद्र चहलने भाष्य केलं आहे. 

युजवेंद्र चहलने नुकतीच राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या पॉडकास्टमध्ये त्याने RJ महावशसोबतच्या नात्याबद्दल स्पष्टीकरण दिलं. युजवेंद्र चहल म्हणाला, "मी घटस्फोटानंतर कितीतरी दिवस ग्राऊंडवर गेलो नव्हतो. त्यामुळे आम्हाला चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल बघण्यासाठी बोलवण्यात आलं होतं. मलाही पाहायची होती. तिथे आम्ही एकत्र बसलेलो दिसलो. घटस्फोटानंतर पहिल्यांदा मी कोणाबरोबर तरी दिसलो. त्यामुळे लोकांनी या गोष्टी बनवायला सुरुवात केली. आम्ही तेव्हा ट्रेंडिंग होतो. लोकांना चर्चा करायच्या आहेत तर करू दे. पण, जे काही आहे ते तिनेही स्पष्ट केलेलं आहे". 

"RJ महावशसाठी हे खूप कठीण होतं. तिने आमचं घर मोडलं, तिच्यामुळे घटस्फोट झाला असं बोललं गेलं. खूप घाणेरड्या कमेंट्स केल्या गेल्या. तू चहलसोबत का आलीस, असंही बोललं गेलं. मला याचं खूप वाईट वाटलं. घटस्फोटानंतर डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी ज्यांनी मला मदत केली त्या जवळच्या मित्रांपैकी RJ महावश एक होती. आणि लोकांनी तिचं नाव माझ्यासोबत जोडलं. तेव्हा तर कुठेही गेलं तरी फोटो येत होते. डिसेंबरमध्ये आम्ही ५ जण ख्रिसमस डिनरला गेलो होतो. पण, आमच्या दोघांचेच फोटो व्हायरल झाले. आणि असं म्हटलं गेलं की आम्ही डिनर डेटला गेलो होतो", असंही चहल म्हणाला. 

पुढे त्याने सांगितलं की, "RJ महावशचं कामचं सोशल मीडियावर असतं. त्यामुळे अशा कमेंट्स वाचणं ज्यात काहीच तथ्य नाही. तर कोणालाही वाईटच वाटेल. जेव्हा तिला लोकांनी हाऊसब्रेकरचा टॅग तिला तेव्हा ती मला म्हणाली की एक मुलगी म्हणून मला वाईट वाटतंय. मी तिला समजावलं. पण, तरी किती दुर्लक्ष करणार? तिला कुटुंबातूनही याबाबत विचारलं गेलं. भारतात मुलींसाठी हे खूप कठीण आहे". 

Web Title: yuzvendra chahal talk about relationship with rj mahavash said people tag her housebreaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.