जस्ट फ्रेंड की गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड? लंडनमध्ये RJ महावशसोबत फिरतोय युजवेंद्र चहल, फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 15:09 IST2025-07-14T15:08:27+5:302025-07-14T15:09:05+5:30
चहल आणि RJ महावशला लंडनमध्ये स्पॉट करण्यात आलं आहे. लंडनमधील त्या दोघांचे काही फोटो समोर आले आहेत.

जस्ट फ्रेंड की गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड? लंडनमध्ये RJ महावशसोबत फिरतोय युजवेंद्र चहल, फोटो आले समोर
भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल धनश्री वर्माला घटस्फोट दिल्यापासून त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. धनश्रीपासून वेगळे झाल्यानंतर चहल RJ महावशला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अनेक ठिकाणी त्यांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं. आयपीएलच्या सामन्यांदरम्यानही RJ महावश स्टेडियममध्ये चहलला चिअर अप करताना दिसली होती. तर आयपीएलच्या पार्टीमध्येही तिला स्पॉट करण्यात आलं होतं. आता ते दोघे लंडनमध्ये एकत्र व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत.
चहल आणि RJ महावशला लंडनमध्ये स्पॉट करण्यात आलं आहे. लंडनमधील त्या दोघांचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये ते एकत्र दिसत नसले तरी एकाच स्पॉटवर उभे राहून चहल आणि RJ महावशने हे फोटो काढल्याचे दिसत आहे. चहल आणि RJ महावश या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडियावरुन लंडन ट्रिपचे हे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे ते दोघेही एकत्र लंडन ट्रिपला गेल्याचं म्हटलं जात आहे.
युजवेंद्र चहलने नुकतीच द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. यामध्ये त्याने RJ महावशसोबतच्या रिलेशनशिपवर हिंट दिली होती. कोण आहे ती मुलगी? असं विचारताच "आता सगळ्या भारताला माहितीये", असं चहल म्हणाला होता. पण, अद्याप RJ महावश किंवा युजवेंद्र चहलने त्यांच्यातील रिलेशनशिप ऑफिशियल केलेलं नाही.