​युवराज सिंग, हेजल किच नव्हे तर गीता बसरा आणि हरभजन सिंग झळकणार नच बलियेमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2017 16:46 IST2017-04-19T11:16:26+5:302017-04-19T16:46:26+5:30

नच बलियेच्या या सिझनमध्ये अनेक प्रसिद्ध सेलिब्रेटी प्रेक्षकांना थिरकताना दिसत आहेत. या सिझनचा टिआरपी पहिल्या भागापासूनच खूप चांगला आहे. ...

Yuvraj Singh, Hedgehch Koch, Geeta Basra and Harbhajan Singh will not be seen in Nal Balia | ​युवराज सिंग, हेजल किच नव्हे तर गीता बसरा आणि हरभजन सिंग झळकणार नच बलियेमध्ये

​युवराज सिंग, हेजल किच नव्हे तर गीता बसरा आणि हरभजन सिंग झळकणार नच बलियेमध्ये

बलियेच्या या सिझनमध्ये अनेक प्रसिद्ध सेलिब्रेटी प्रेक्षकांना थिरकताना दिसत आहेत. या सिझनचा टिआरपी पहिल्या भागापासूनच खूप चांगला आहे. त्यामुळे हा टिआरपी तसाच राहावा यासाठी या मालिकेची टीम प्रयत्न करत आहे. युवराज सिंग आणि हेजल किच हे सेलिब्रेटी कपल या कार्यक्रमात झळकणार असल्याची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होती. पण युवराज सध्या आयपीएलमध्ये व्यग्र असल्याने तो कार्यक्रमाचा भाग होणार नाही असे म्हटले जात आहे. तसेच हेजलनेदेखील यासंबंधित  एका मुलाखतीत म्हटले आहे की, युवराज आणि मी नच बलियेचा भाग असणार या सगळ्या केवळ अफवा आहेत. युवराज आणि हेजलचे नृत्य पाहायला न मिळाल्यामुळे त्यांच्या फॅन्सची निराशा झाली आहे. पण नच बलियेच्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे.
युवराज आणि हेजल नव्हे तर आता गीता बसरा आणि हरभजन सिंग नच बलिये या कार्यक्रमात झळकणार आहेत. त्यांनी या कार्यक्रमासाठी नुकतेच चित्रीकरण केले आहे. हरभजन आणि गीता स्पर्धक म्हणून नव्हे तर गेस्ट परफॉर्मर म्हणून कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत आणि ते केवळ एका भागात प्रेक्षकांना दिसणार आहेत. एका वेबसाइटच्या बातमीनुसार या दोघांनी खूपच चांगला परफॉर्मन्स सादर केला असल्याचे म्हटले जात आहे. गीता ही एक अभिनेत्री असून तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती एक चांगली नर्तिकादेखील आहे. तसेच हरभजनचे नृत्य आपल्याला अनेक रिअॅलिटी शोमध्ये पाहायला मिळालेले आहे.
हजभरजनने याआधीदेखील अनेक रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. तो एक खिलाडी एक हसिना, रोडिज यांसारख्या कार्यक्रमात झळकला होता. 



Web Title: Yuvraj Singh, Hedgehch Koch, Geeta Basra and Harbhajan Singh will not be seen in Nal Balia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.