श्रेया बुगडेच्या स्वभावातील ही गोष्ट ऐकून, तुम्हाला ही वाटेल आश्चर्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 17:44 IST2019-01-16T17:31:56+5:302019-01-16T17:44:29+5:30

'कानाला खडा' या कार्यक्रमात श्रेया बुगडे येऊन गेली आणि तिने संजय मोने यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. तिच्या जवळच्या व्यक्तींनी तिच्याबद्दल कशामुळे कानाला खडा लावला याचा देखील उलगडा झाला

You will be shocked when you know about sherya bugde this truth | श्रेया बुगडेच्या स्वभावातील ही गोष्ट ऐकून, तुम्हाला ही वाटेल आश्चर्य!

श्रेया बुगडेच्या स्वभावातील ही गोष्ट ऐकून, तुम्हाला ही वाटेल आश्चर्य!

ठळक मुद्देशाळेत असल्यापासूनच श्रेया खूप शिस्तप्रिय आणि एक उत्तम विद्यार्थी होतीमावशीने श्रेयाच्या स्वभावाविषयी खुलासा केला

झी मराठी वाहिनीवरील संजय मोने यांच्या 'कानाला खडा' या चॅट शोची सर्वत्र चर्चा चालू आहे. या कार्यक्रमात संजय मोने कलाकारांशी गप्पा मारतात आणि त्यांच्या आयुष्यातील काही आठवणींना उजाळा देतात. तसंच कलाकारांच्या आयुष्यातील कानाला खडा लावणारे काही किस्से देखील या गप्पांमध्ये रंगतात. 


नुकतीच कानाला खडा या कार्यक्रमात श्रेया बुगडे येऊन गेली आणि तिने संजय मोने यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. तिच्या जवळच्या व्यक्तींनी तिच्याबद्दल कशामुळे कानाला खडा लावला याचा देखील उलगडा झाला. श्रेया तिच्याबद्दल आणि तिच्या स्वभावाबद्दल बोलताना म्हणाली, ''कि खऱ्या आयुष्यात आधीपासून खूप गंभीर आहे. ती शाळेत असल्यापासूनच खूप शिस्तप्रिय आणि एक उत्तम विद्यार्थी होती. सगळ्यांना खळखळून हसवणारी विनोदवीर हि खऱ्या आयुष्यात गंभीर होती हि गोष्ट संजय मोने यांना खरी वाटली नाही म्हणून त्यांनी पुरावा म्हणून तिच्या मावशीला बोलावलं.

मावशीने श्रेयाच्या स्वभावाविषयी खुलासा केला तसंच तिचं निरीक्षण किती चांगलं आहे याबाबत देखील मावशी बोलल्या. थोडक्यात काय तर श्रेया खऱ्या आयुष्यात थोडीफार खोडकर आहे पण तितकीच निरागस देखील आहे.

Web Title: You will be shocked when you know about sherya bugde this truth