"तुम्ही तर माझ्यासोबत राहिला नाहीत...", विकीसोबत कसं आहे अंकिताचं नातं, अभिनेत्रीचा सासूसमोर खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 09:12 IST2024-01-13T09:12:07+5:302024-01-13T09:12:33+5:30

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) बिग बॉस १७(Bigg Boss 17)च्या घरात त्यांच्या भांडणामुळे चर्चेत आहेत.

"You didn't stay with me...", How is Ankita Lokhande's relationship with Vicky Jain, the actress revealed to her mother-in-law | "तुम्ही तर माझ्यासोबत राहिला नाहीत...", विकीसोबत कसं आहे अंकिताचं नातं, अभिनेत्रीचा सासूसमोर खुलासा

"तुम्ही तर माझ्यासोबत राहिला नाहीत...", विकीसोबत कसं आहे अंकिताचं नातं, अभिनेत्रीचा सासूसमोर खुलासा

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) बिग बॉस १७(Bigg Boss 17)च्या घरात त्यांच्या भांडणामुळे चर्चेत आहेत. या जोडीमध्ये अनेकदा भांडणे होतात, अलीकडे त्यांनी एकमेकांपासून ब्रेक घेण्याची चर्चाही केली होती. एपिसोडमध्ये अंकिताने तिचा पती विकीच्या आईशीही तिच्यासोबतच्या नातेसंबंधाबद्दल सांगितले. अभिनेत्री म्हणाली की तिच्या वैवाहिक नात्यात चूक करणारी ती एकटीच नव्हती. विकी जैनच्या आईशी बोलताना अंकिता लोखंडे भावूक झाली. रात्री अंकिता लोखंडे हिने विकी जैनच्या आईकडे येऊन बोलण्याची इच्छा व्यक्त केली होती.

आधी विकी जैनच्या आईने अंकिताशी बोलण्यास नकार दिला, पण नंतर दोघांमध्ये बोलणे झाले. पवित्र रिश्ता फेम अभिनेत्री तिच्या सासूला म्हणाली, मी एकटीच चूकीची आहे ना मम्मा. मला असे म्हणायचे आहे की दोन्ही बाजूंनी गोष्टी घडल्या आहेत. ती पुढे म्हणाली की, 'मी इथे जी काही आहे, बाहेरही तीच आहे. तू माझ्यासोबत कधीच नव्हतीस त्यामुळे तुला माहीतही नाही मी कशी राहते आणि विकी कसा राहतो. म्हणूनच मला हे सांगणे महत्त्वाचे वाटते की आम्ही अशीच मस्ती करत राहतो.

अंकिताने विकीच्या आईची मागितली माफी 
अंकिता लोखंडे पुढे म्हणाली, 'या गोष्टीचा माझ्यावर खूप परिणाम होत आहे की माझे कुटुंबीय मला समजू शकत नाहीत. मम्मा, मला खरंच हात जोडून तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं, माझ्यामुळे कोणाला काही त्रास झाला असेल तर मी माफी मागते. दरम्यान, विकी जैन हाही खोलीत आला आणि त्यांना समजावू लागला.

Web Title: "You didn't stay with me...", How is Ankita Lokhande's relationship with Vicky Jain, the actress revealed to her mother-in-law