मानसी नाईकची तू माझा सांगातीमध्ये एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 12:37 IST2017-09-12T07:07:28+5:302017-09-12T12:37:28+5:30

गणपती बाप्पा मोरया या मालिकेत मानसी नाईकने पार्वतीची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. आता ...

You are the author of Mansi Naik | मानसी नाईकची तू माझा सांगातीमध्ये एंट्री

मानसी नाईकची तू माझा सांगातीमध्ये एंट्री

पती बाप्पा मोरया या मालिकेत मानसी नाईकने पार्वतीची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. आता प्रेक्षकांना मानसी एका नव्या भूमिकेत दिसणार असून तिने या मालिकेसाठी चित्रीकरण करायला देखील सुरुवात केली आहे. 
तू माझा सांगाती ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ही मालिका प्रेक्षकांना खूपच आवडते आणि आता या मालिकेचे नवे पर्व नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. या नव्या पर्वात तुकारामाच्या मुखी विठ्ठल रखुमाबाईची संसारगाथा प्रेक्षकांना ऐकायला मिळत आहे आणि या मालिकेत विठ्ठलाची भूमिका मराठीतील प्रसिद्ध अभिनेता भरत जाधव साकारत असून स्मिता शेवाळे रखुमाईच्या भूमिकेत दिसत आहे. भरत जाधव आणि स्मिता शेवाळे यांना खूपच कमी दिवसांत त्यांच्या भूमिकेसाठी प्रेक्षकांच्या खूपच चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. आता या मालिकेत मानसी नाईकची एंट्री होणार असून मानसी या मालिकेत सत्यभामाच्या भूमिकेत झळकणार आहे. या मालिकेतील तिचा लूक खूपच वेगळा असून या लूकमध्ये ती खूपच छान दिसत आहे. 
तू माझा सांगाती या मालिकेत चिन्मय मांडलेकर संत तुकारामांची भूमिका साकारत असून चिन्मयच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. चिन्मय तुकारामांची भूमिका साकारत असल्याने अनेकवेळा लोक त्याच्या पायादेखील पडत असल्याचे पाहायला मिळते. चिन्मयसोबतच आता मराठीतील अनेक दिग्गज कलाकार प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळत आहे. 
मानसी नाईकने अनेक मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे. तिच्या फॅन्सना तिला नव्या भूमिकेत पाहायला नक्कीच आवडेल यात काही शंकाच नाही.  
मानसी नाईकने याआधी पौराणिक मालिकेत काम केले असले तरी भरत आणि स्मिता शेवाळे यांनी कधीच कोणत्या पौराणिक मालिकेत काम केले नव्हते. ते दोघेही या मालिकेत काम करणे खूप एन्जॉय करत आहेत. या मालिकेत काम करताना त्यांना एक वेगळा अनुभव मिळत आहे आणि विशेष म्हणजे तो कृष्णाचा भक्त असल्याने या मालिकेत भूमिका साकारायला मिळत असल्याने तो खूपच खूश आहे.

Also Read : ‘भूमिकेमुळे मी माणसे जोडली’ - चिन्मय मांडलेकर

Web Title: You are the author of Mansi Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.