लग्नाच्या वर्षभरात योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा?, एकमेकांना केलं अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 12:31 IST2025-10-28T12:30:50+5:302025-10-28T12:31:27+5:30
Yogita Chavan-Saurabh Choughule: 'जीव माझा गुंतला' मालिकेतून घराघरात पोहचलेले योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले ही जोडी विभक्त झाल्याचे बोलले जात आहे.

लग्नाच्या वर्षभरात योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा?, एकमेकांना केलं अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट
सिनेइंडस्ट्रीतील अनेक कपल्स वेगळ्या झाल्याच्या चर्चा आणि बातम्या समोर येत आहेत. माही वीज आणि जय भानुशाली घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सगळीकडे रंगली आहे. तसेच सुयश टिळक आणि आयुषी भावे यांचेही बिनसले असल्याचे बऱ्याच दिवसांपासून बोलले जात आहे. दरम्यान आता मराठी कलाविश्वातील आणखी एक जोडपे विभक्त होणार असल्याची चर्चा रंगली आहे. हे जोडपे कोण आहे? तर हे जोडपे म्हणजे जीव माझा गुंतला मालिकेतून घराघरात पोहचलेले योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले. या जोडीने २०२४मध्ये लग्नगाठ बांधली. मात्र आता ही जोडी विभक्त झाल्याचे बोलले जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांच्या एकत्र पोस्ट पाहायला मिळत नाहीत. तसेच त्यांनी दिवाळीतही एकमेकांसोबतचे फोटो शेअर केले नाहीत. तसेच त्यांच्या लग्नाचेही सोशल मीडियावरील फोटो डिलीट करण्यात आले आहेत. एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलोदेखील केले आहे. फक्त त्यांचे ग्रुप फोटो, जुने रिल्स आणि मुलाखती सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. योगिता आणि सौरभ यांच्या नात्यात खरंच दुरावा आला आहे की नेमकं एकमेकांना अनफॉलो करण्यामागे काही वेगळं कारण आहे का, हे अद्याप समजू शकलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ते गेल्या काही महिन्यांपासून एकत्र राहत नसल्याचे समजते आहे. अद्याप या जोडप्याने या चर्चेवर अधिकृत विधान केलेले नाही.
मालिकेच्या शूटिंगदरम्यान पडले एकमेकांच्या प्रेमात
जीव माझा गुंतला मालिकेच्या शूटिंगदरम्यान योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. लग्नानंतर योगिता 'बिग बॉस मराठी सीझन ५'मध्ये सहभागी झाली होती. पण लवकरच घराबाहेर पडली.