अदा खानचे एक्स बॉयफ्रेंडसह पुन्हा जुळले सूत !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2017 12:56 IST2017-08-18T07:26:20+5:302017-08-18T12:56:20+5:30
चित्रपटसृष्टी असो किंवा टीव्ही इंडस्ट्री मनोरंजनाच्या झगमगत्या दुनियेत नाती पटकन बनतात आणि ती तितक्याच लवकर तुटतात. कितने अजीब रिश्ते ...
.jpg)
अदा खानचे एक्स बॉयफ्रेंडसह पुन्हा जुळले सूत !
च त्रपटसृष्टी असो किंवा टीव्ही इंडस्ट्री मनोरंजनाच्या झगमगत्या दुनियेत नाती पटकन बनतात आणि ती तितक्याच लवकर तुटतात. कितने अजीब रिश्ते है यहाँ पे या गाण्यांच्या ओळींप्रमाणे ही नाती असतात. दर दिवशी नात्याचे रंग बदलत असतात. कधी इथं एकमेंकांबद्दल प्रेम वाटतं. यातूनच अनेकांना त्यांना त्यांचा जीवनाचा जोडीदार सापडतो. मात्र क्षणात असं काही होतं की याच दोन व्यक्ती एकमेकांचा तिरस्कार करु लागतात. एकमेकांचं तोंडही ते पाहत नाहीत. असंच काहीसं छोट्या पडद्यावरील नागिन-2 फेम अभिनेत्री अदा खान हिच्याबाबतही म्हणता येईल. तिच्या आयुष्यात एक काळ असा आला होता की ती व्यक्ती तिला तिच्या आसपासही नको होती. त्या व्यक्तीचं बाजूनं जाणंही तिला मान्य नव्हतं. मात्र आता चित्र असं काही पालटलं आहे की अदा त्याच व्यक्तीसोबत आपल्या नव्या आयुष्याची स्वप्नं रंगवू लागली आहे.अदाच्या आयुष्यातील ती व्यक्ती म्हणजे टीव्ही अभिनेता अंकित गेरा. अदा आणि अंकित ब-याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. मात्र कालांतराने दोघांच्या प्रेमाच्या नात्यात मोठं वादळ आलं आणि दोघंही एकमेकांपासून दुरावले. कधी काळी अदा आणि अंकित एकमेकांसाठी अक्षरक्षः वेडे झाले होते. दोघांचे प्रेम जणू काही ऊतू जात होतं. त्याचवेळी त्यांच्या आयुष्यात एक तिसरी व्यक्ती आली आणि अदा-अंकित यांच्यातल्या प्रेमाच्या नात्याला जणू काही नजरच लागली. ही तिसरी व्यक्ती म्हणजे 'सपने सुहाने लड़कप्पन’ या मालिकेतील अभिनेत्री रुपल त्यागी. प्रेमाच्या या त्रिकोणाची प्रत्येक स्टोरी कायमच चर्चेत असायची. यानंतर अदा आणि अंकितमध्ये ब्रेकअप झालं. या बातमीनं टीव्ही इंडस्ट्रीमध्ये वादळच आलं. अंकित एकाच वेळी अदा आणि रुपल दोघींनाही डेट करत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र अंकितने त्याचा साफ इन्कार करत त्या निव्वळ अफवा असल्याचं सांगितले होते. मात्र एका वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार अदा आणि अंकित यांचे सूर पुन्हा एकदा जुळू लागले आहे. दोघंही बराच काळ एकमेकांसोबत घालवत आहेत. पूजा बॅनर्जीच्या साखरपुडा सोहळ्यालाही दोघांनी एकत्र हजेरी लावली आणि दोघंही बराच काळ सोबत होते. यावरुन दोघांमधील गैरसमज दूर झाला असून पुन्हा एकदा आपल्या जुन्या नात्याला एक संधी देण्याचं अदा आणि अंकितनं ठरवल्याचं समजतंय. 'बिग बॉस'च्या नवव्या सीझनमध्ये अंकित रुपलसह पाहायला मिळाला होता आणि सध्या तो अग्निफेरा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे.