'योगयोगेश्वर जय शंकर' फेम आरूष बेडेकरची होणार 'गाथा नवनाथांची' मालिकेत एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 15:58 IST2023-10-25T15:43:47+5:302023-10-25T15:58:56+5:30
आरूषने याआधीही आपल्या निरागस अभिनयानी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेतच आता बाल नागनाथांच्या भूमिकेत तो कशा पद्धतीनं आपल्याला भुरळ घालतो, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

'योगयोगेश्वर जय शंकर' फेम आरूष बेडेकरची होणार 'गाथा नवनाथांची' मालिकेत एंट्री
उत्तम सादरीकरण करते आहे. भक्तिरसात तल्लीन होण्यासाठी भाग पाडणारी ही मालिका लहानांपासून-मोठ्यांपर्यंत साऱ्यांचीच लाडकी असून अशा मालिका आत्ताच्या घडीला प्रसारित करणं ही आपली जबाबदारी समजून सोनी मराठी या मालिकांच्या भागांची अभ्यासपूर्ण मांडणी करत असते. आता बाल नागनाथांचा महिमा 'गाथा नवनाथांची' या मालिकेमध्ये पाहायला मिळतो आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांचा लाडका बालकलाकार आरूष बेडेकर बाल नागनाथांची भूमिका साकारणार आहे. आरूषने याआधीही आपल्या निरागस अभिनयानी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेतच आता बाल नागनाथांच्या भूमिकेत तो कशा पद्धतीनं आपल्याला भुरळ घालतो, हे पाहणं रंजक ठरणार आहे.
एका गावात दुष्काळग्रस्थ परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुष्काळग्रस्त गावात बालनागनाथ कशाप्रकारे येतात आणि बाल नागनाथांच्या अवतरण्याने त्या गावाचा कसा कायापालट होतो, याची चमत्कारिक गोष्ट या विशेष भागांत दाखवण्यात येणार आहे. सोनी मराठीवरील 'गाथा नवनाथांची' या मालिकेने अनेक भाग पूर्ण केले आहेत. त्याद्वारे नाथसंप्रदाय आणि त्याची शिकवण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या मालिकेने यशस्वीरीत्या पार पडलं आहे, असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. नाथसंप्रदाय आपल्या शिकवणीद्वारे त्यांच्या भक्तांना मोक्षप्राप्तीचे सरळ-साधे मार्ग दाखवत असतात, जेणेकरून प्रपंच आणि जबाबदाऱ्या यांच्या मागे धावणाऱ्या आपल्या शिष्यांना, आपल्या भक्तांना काही प्रमाणात दिलासा मिळेल. कधी चमत्कार तर कधी साक्षात्कार देत नाथसंप्रदाय समजला एकवटण्याचं कार्य करीत आलेला आहे. सोम. ते शनि. संध्या. ६.३० वा. 'गाथा नवनाथांची' ही मालिका तुम्ही सोनी मराठीवर पाहू शकता.
बाल नागनाथ आणि त्यांचा जीवनप्रवास रेखाटणारे 'गाथा नवनाथांची' या मालिकेतले पुढचे विशेष भाग हे आरूष बेडेकर या प्रसिद्ध बालकलाकाराच्या अभिनयाने आणखी रंजक झाले आहेत. बाल नागनाथांच्या भूमिकेत आरूषनेही खूप मेहनत घेतली आहे.