'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील स्वीटू आणि चिन्याचा डान्स होतोय व्हायरल, पहा हा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 16:49 IST2021-04-28T16:48:51+5:302021-04-28T16:49:18+5:30
स्वीटू म्हणजेच अभिनेत्री अन्विता फलटणकरने रील व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील स्वीटू आणि चिन्याचा डान्स होतोय व्हायरल, पहा हा व्हिडीओ
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे मालिकांचे चित्रीकरणही थांबवण्यात आले होते. मात्र आता वाहिन्यांनी यावर तोडगा काढत चित्रीकरण इतर राज्यांमध्ये हलविले आहे. तसेच झी मराठी वाहिनीवरील येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेचेही शूटिंग दमणमध्ये सुरू आहे. नुकतेच या मालिकेच्या सेटवर ओम म्हणजेच अभिनेता शाल्वचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर आता शूटिंगमधून वेळ मिळाल्यानंतर स्वीटू म्हणजेच अभिनेत्री अन्विता फलटणकरने रील व्हिडीओ शेअर केला आहे.
येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील स्वीटू म्हणजेच अन्विता फलटणकरने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. पॅकअप लवकर झाल्यामुळे खूश होऊन ती आणि मालिकेतील तिचा भाऊ चिन्या ओ हो हो हो गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडीओला खूप पसंती मिळते आहे.
येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत ओम आणि मोमोचा साखरपुडा मोडला आहे. एकीकडे स्वीटूच्या लग्नाची तयारी सुरू आहे तर दुसरीकडे ओम तिला लग्नासाठी मनवण्यासाठी प्रयत्न करतो आहे.
दरम्यान स्वीटूच्या वडिलांना तिच्या लग्नाची काळजी वाटत असल्यामुळे ते चिंतेत असतात. ते जेवायलाही तयार नसतात. तितक्यात स्वीटू आणि ओम तिथे येतो. ओम त्यांना जेवण भरवतो. हे पाहून स्वीटूच्या आई म्हणजेच नलूचे मन ओम जिंकू शकेल का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.