'ये रिश्ता क्या कहलाता है'मधील अभिनेत्रीला झाली कोरोनाची लागण, आहे एका प्रसिद्ध राजकारण्याची सून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 18:59 IST2020-06-01T18:57:55+5:302020-06-01T18:59:20+5:30

या अभिनेत्रीसोबतच तिच्या संपर्कातील १७ जणांचे रिपॉर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सगळ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

Yeh Rishta Kya Kehlata Hai actor Mohena Kumari Singh and her family test positive for corona virus PSC | 'ये रिश्ता क्या कहलाता है'मधील अभिनेत्रीला झाली कोरोनाची लागण, आहे एका प्रसिद्ध राजकारण्याची सून

'ये रिश्ता क्या कहलाता है'मधील अभिनेत्रीला झाली कोरोनाची लागण, आहे एका प्रसिद्ध राजकारण्याची सून

ठळक मुद्देस्टार प्लसवरील ये रिश्ता क्या कहलाता है या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्री मोहेना कुमारीला कोरोनाची लागण झाली आहे. मोहोना ही उत्तराखंडचे मंत्री सतपाल महाराज यांची सून आहे.

संपूर्ण देश कोरोना व्हायरसचा कहर झेलत असताना आता या महामारीने गंभीर रूप धारण केले आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतही या महामारीचा कहर पाहायला मिळतोय. आता टिव्ही इंडस्ट्रीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीला कोरोनाची लागण झाली आहे.

स्टार प्लसवरील ये रिश्ता क्या कहलाता है या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्री मोहेना कुमारीला कोरोनाची लागण झाली आहे. मोहोना ही उत्तराखंडचे मंत्री सतपाल महाराज यांची सून आहे. सतपाल यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील आणि बाहेरच्या लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी मोहेनासोबतच १७ जणांचे रिपॉर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे या सगळ्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. 

मोहेनाने ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेसोबतच सिलसिला प्यार का, प्यार तुने क्या किया, गुमराह यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ती एक अभिनेत्री असण्यासोबतच एक खूप चांगली डान्सर देखील आहे. डान्स इंडिया डान्स या प्रसिद्ध कार्यक्रमाचा देखील ती भाग होती.

बॉलिवूडमध्ये आत्तापर्यंत अनेक अभिनेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्वात आधी सिंगर कनिका कपूर ही कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. त्यानंतर निमार्ता करीम मोरानी आणि त्यांच्या दोन्ही मुली जोआ मोरानी, शाजिया मोरानी कोरोना संक्रमित आढळल्या होत्या. नुकतीच किरण कुमार या अभिनेत्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. पण या सगळ्यांनी कोरोनावर मात केली असून त्यांची सगळ्यांची तब्येत आता चांगली आहे.

Web Title: Yeh Rishta Kya Kehlata Hai actor Mohena Kumari Singh and her family test positive for corona virus PSC