आधी मर्सिडीज अन् आता मुंबईत घर! अवघ्या २४ वर्षाच्या 'ये है मोहब्बते' फेम अभिनेत्रीची गगनभरारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 14:08 IST2024-06-14T14:06:49+5:302024-06-14T14:08:22+5:30

'ये है मोहब्बते' फेम अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केलं स्वप्नातलं घर, शेअर केले फोटो

yeh hai mohobatten fame actress aditi bhatia buys dream house in mumbai at age of 24 | आधी मर्सिडीज अन् आता मुंबईत घर! अवघ्या २४ वर्षाच्या 'ये है मोहब्बते' फेम अभिनेत्रीची गगनभरारी

आधी मर्सिडीज अन् आता मुंबईत घर! अवघ्या २४ वर्षाच्या 'ये है मोहब्बते' फेम अभिनेत्रीची गगनभरारी

'ये है मोहब्बते' ही छोट्या पडद्यावरील गाजलेल्या मालिकांपैकी एक असलेली मालिका. स्टार प्लसवरील या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. इशिता-रमन यांच्या जोडीबरोबरच रूहीने देखील प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. या मालिकेत मोठ्या रूहीची भूमिका अभिनेत्री अदिती भाटिया हिने साकारली होती. २४ वर्षीय अदितीने नुकतंच मुंबईत घर खरेदी केलं आहे. 

अदितीने सोशल मीडियावरुन तिच्या नव्या घराचे काही फोटो शेअर केले आहेत. मुंबईत घर खरेदी करत अदितीने तिचं स्वप्न पूर्ण केलं आहे. नुकतंच तिने घरात गृहप्रवेश देखील केला. याचे फोटो शेअर करत ही गुडन्यूज तिने चाहत्यांना दिली आहे. "नवीन घर" असं कॅप्शनही तिने फोटोला दिलं आहे. या फोटोंमध्ये अदितीच्या नव्या घराची झलक पाहायला मिळत आहे. फोटोत अदितीची आईदेखील दिसत आहे. तिच्या या फोटोंवर कमेंट करत चाहत्यांनी अदितीला शुभेच्छा दिल्या आहेत. 

मार्च महिन्यातच अदितीने मर्सिडीज बेंझ ही गाडी खरेदी केली होती. याचा व्हिडिओही तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर आता तीनच महिन्यांत तिने घर खरेदी केलं आहे. २४ वर्षांत ही कामगिरी केल्याने अदितीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

'ये है मोहोब्बते' या मालिकेने अदितीला लोकप्रियता मिळवून दिली. यानंतर अनेक मालिका आणि टीव्ही शोमध्ये ती दिसली होती. अनेक सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे. पण, आता तिने अभिनय क्षेत्राला रामराम केला आहे. आता अदिती प्रॉडक्ट अॅडमध्ये काम करत आहे. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. 

Web Title: yeh hai mohobatten fame actress aditi bhatia buys dream house in mumbai at age of 24