'ये है मोहोब्बतें' फेम अभिनेत्री लवकरच होणार आई, लग्नानंतर तीन वर्षांनी दिली गुडन्यूज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 18:28 IST2025-04-26T18:27:21+5:302025-04-26T18:28:02+5:30
एका टीव्ही अभिनेत्रीने गुडन्यूज दिली आहे. 'ये है मोहोब्बतें' फेम अभिनेत्री लग्नानंतर तीन वर्षांनी आई होणार आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.

'ये है मोहोब्बतें' फेम अभिनेत्री लवकरच होणार आई, लग्नानंतर तीन वर्षांनी दिली गुडन्यूज
एका टीव्ही अभिनेत्रीने गुडन्यूज दिली आहे. 'ये है मोहोब्बतें' फेम अभिनेत्री लग्नानंतर तीन वर्षांनी आई होणार आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. 'ये है मोहोब्बतें'मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिरीन मिर्झा आई होणार आहे. शिरीनच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.
शिरीनने पती हसन सरताजसोबत मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. याचा व्हिडिओ तिने शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने बेबी बंपही फ्लॉन्ट केला आहे. एका शेतात शिरीनने हे फोटोशूट केलं आहे. व्हिडिओ शेअर करत ती म्हणते, "आल्लाहने योग्य वेळी आमच्या प्रार्थनांना प्रतिसाद दिला. त्याने आमच्या प्रार्थना ऐकल्या. त्याचा आणि माझा अंश असलेला छोटा पाहुणा आकार घेत आहे. आमच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होत आहे. पालक होणार असल्याने आम्ही आणखी प्रार्थना करत आहोत. अल्लाह आमच्या बाळाचं रक्षण कर. आणि त्याला वाढवण्यासाठी आम्हाला योग्य रस्ता दाखव".
शिरीनने शेअर केलेल्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. शिरीन मिर्झाने २०२१ मध्ये हसन सरताजसोबत लग्न केलं होतं. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'ये है मोहोब्बतें'मध्ये तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती.