'खतरों के खिलाडी 10' साठी या अभिनेत्याला मिळाले सगळ्यात जास्त मानधन, आकडा वाचून चक्रवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 13:12 IST2020-02-18T13:09:19+5:302020-02-18T13:12:56+5:30
Khatron Ke Khiladi 10 Show : करण पटेलने 'कहानी घर घर की', 'कसौटी जिंदगी की', 'केसर', 'काव्यांजली', 'करम अपना अपना' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही 'ये है मोहोब्बते' या मालिकेमुळे मिळाली.

'खतरों के खिलाडी 10' साठी या अभिनेत्याला मिळाले सगळ्यात जास्त मानधन, आकडा वाचून चक्रवाल
छोट्या पडद्यावरील खतरों के खिलाडी या रियालिटी शोची रसिकांना उत्सुकता असते. सुरूवातीला खिलाडी अक्षय कुमार आणि त्यानंतर बॉलीवूडचा दिग्दर्शक रोहित शेट्टी सूत्रसंचालक असलेला हा रियालिटी शो रसिकांमध्ये लोकप्रिय ठरला आहे. लवकरच या रियालिटी शोचं दहावं पर्व रसिकांच्या भेटीला येत आहे. यंदाच्या पर्वात सहभागी होणारं मराठमोळं नाव म्हणजे अमृता खानविलकर.
कोरिओग्राफर धर्मेश,आरजे मलिष्का,अभिनेत्री अदा खान, तेजस्विनी प्रकाश,करिश्मा तन्ना, ये है मोहब्बतें' फेम करण पटेल, कॉमेडियन बलराज सयाल, शिवीन नारंग, भोजपुरी अभिनेत्री राणी चटर्जीसुद्धा 'खतरों के खिलाडी' या पर्वात सहभागी होणार आहे.
सहभागी होणा-या कलाकारांची यादी समोर आल्यानंतर आता त्यांना मिळालेल्या मानधनावर चर्चा रंगत आहेत. प्रत्येक कलाकाराला त्याची लोकप्रियता आणि त्यांच्या क्षमतेनुसार मानधन दिले गेले आहे. या सगळ्यांमध्ये करण पटेल सगळ्यात महागडा स्पर्धक आहे. स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार करणला स्पेशल एडिशनचे 5-6 लाख इतके मानधन देण्यात आले आहे. स्पेशल एडिशनचे असे अंदाजे 10 एपिसोड असणार आहे. यंदाचे सिझनचे शूटिंग बुल्गारियामध्ये होणार आहे. लवकरच सगळेच बुल्गारियामध्ये शूटिंगसाठी रवाना होतील.सुरूवात होण्याआधीच करण पटेल, करिश्मा तन्ना, बलराज सयाल आणि शिविन नारंग टॉप 4 यादीत असतली अशी भाकित वर्तवले जात आहे. 'खतरों के खिलाडी 10' 22 फेब्रुवारीपासून रसिकांच्या भेटीला येणार आहे.
करणने 'कहानी घर घर की', 'कसौटी जिंदगी की', 'केसर', 'काव्यांजली', 'करम अपना अपना' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही 'ये है मोहोब्बते' या मालिकेमुळे मिळाली. रमन भल्ला या भूमिकेमुळे प्रसिद्धी मिळाली. गेल्या वर्षी जुलैमध्ये करण पटेलने एकता कपूरची सुपरहिट मालिका सोडली आहे. खतरों के खिलाडीमध्ये सहभागी होण्यासाठी करणने ही मालिका सोडली होती.