'माझी तुझी रेशीमगाठ'मध्ये रोमँटिक सीन शूट करताना यश-नेहाची झाली दमछाक, BTS व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 18:51 IST2022-07-16T18:30:16+5:302022-07-16T18:51:43+5:30
प्रार्थना आणि श्रेयसने एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यामध्ये पावसातला हा रोमँटिक सीन शूट करताना पडद्यामागे होणारी दमछाक या BTS व्हिडिओमध्ये पाहायला मिळतेय.

'माझी तुझी रेशीमगाठ'मध्ये रोमँटिक सीन शूट करताना यश-नेहाची झाली दमछाक, BTS व्हिडीओ व्हायरल
'माझी तुझी रेशीमगाठ' (mazi tuzi reshimgath) या मालिकेत यश आणि नेहाच्या आयुष्यात एका नव्या नात्याची सुरुवात झाली आहे. यश आणि नेहाचा ग्रँड लग्नसोहळा पार पडल्यानंतर त्यांचा रोमँटिक ट्रँक गेले बरेच दिवस सुरु आहे.आणि आता तर त्यात पावसाची भर पडलीये. मात्र तुम्हाला वाटतं तेवढा हा सीन सहजरित्या पार पडलेला नाहीये... कारण नुकताच सोशल मिडियावर प्रार्थना आणि श्रेयसने एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यामध्ये पावसातला हा रोमँटिक सीन शूट करतानाची पडद्यामागची मेहनत या BTS व्हिडिओमध्ये पाहायला मिळतेय.
भर पावसात शूटींग करताना कॅमेरा, साऊंड अशा टेक्निकल गोष्टी सांभाळण्याचा हा टास्क कसा पार पाडला जातो याचीच झलक या व्हिडिओच्या माध्यमाकतून दिसतेय. विशेष म्हणजे श्रेयस प्रार्थना देखील सीन संपल्यानंतर त्यांचा मॉन्सून ब्रेक एन्जॉय करतायेत. चाहत्यांनी टीमची ही धावपळ पाहून हा व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव केलाय.
मालिकेत दोघांचा रोमँटिक ट्रॅक जरी सुरु असतला तरी अनेकदा त्यांची नौकझोक देखील होतेय. प्रार्थनाचे सध्याचे लग्नानंतरचे लूक्स प्रेक्षकांना आणखीनंच प्रेमात पाडतायेत. तिच्या साड्या आणि, तिचं मंगळसूत्र या सगळ्याचीच चर्चा आहे. त्यातंच लग्नानंतरच्या लूक्समध्ये तिचं सौंदर्य आणखी खुलून दिसत असल्याचं तिच्या फॅन्सचं म्हणणं आहे.