अरे वाह...! अर्चना पुरण सिंगने तिच्या मोलकरणीला अशाप्रकारे बनविले स्टार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 11:20 IST2020-04-23T11:20:03+5:302020-04-23T11:20:33+5:30

अभिनेत्री अर्चना पुरण सिंगची मोलकरीण भाग्यश्री सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली असून तिचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

Wow ...! This is how Archana Puran Singh made her maid a star TJL | अरे वाह...! अर्चना पुरण सिंगने तिच्या मोलकरणीला अशाप्रकारे बनविले स्टार 

अरे वाह...! अर्चना पुरण सिंगने तिच्या मोलकरणीला अशाप्रकारे बनविले स्टार 

सोशल मीडियावर बऱ्याचदा कलाकार चर्चेत येत असतात. मात्र सोशल मीडियावर सामान्य व्यक्तीदेखील एका रात्रीत स्टार बनू शकतात. याचं ताजे उदाहरण म्हणजे रानू मंडल. त्यानंतर आता सोशल मीडियावर कलाकारांचे नोकरदेखील चर्चेत येताना दिसत आहेत. नुकतीच अभिनेत्री अर्चना पुरन सिंगची मोलकरीण सोशल मीडियावर चर्चेत आली आहे आणि तिचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. 

अभिनेत्री अर्चना पुरन सिंगची मोलकरीण भाग्यश्री सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली असून तिचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. 

नुकताच अर्चनाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात भाग्यश्रीवर छापून आलेले आर्टिकल पाहून 'तू स्टार झालीस' असे अर्चना तिला म्हणत आहे. त्यावर निरागसपणे 'मला वेड लागेल' असे म्हणताना भाग्यश्री दिसत आहे. 'भाग्यश्री रॉक्स. जेव्हा तिला कळले कि ती स्टार बनली आहे' असे कॅप्शन अर्चना हिने व्हिडिओला दिले आहे.

लॉकडाऊन दरम्यान अर्चना अधूनमधून भाग्यश्री हिचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत होती. तिचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

अर्चना पूरन सिंगच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती कपिल शर्मा शोमध्ये पहायला मिळते.

मात्र लॉकडाउनमुळे सध्या शूटिंग बंद आहे. त्यामुळे ती घरात वेळ व्यतित करत आहे.

 

 

 

Web Title: Wow ...! This is how Archana Puran Singh made her maid a star TJL