साक्षी म्हणतेय, टिव्ही हे माझे पहिले प्रेम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 12:47 IST2016-07-13T07:17:42+5:302016-07-13T12:47:42+5:30
साक्षी तन्वर दंगल या चित्रपटात प्रमुख भमिका साकारत आहे. आमिर खानसारख्या अभिनेत्यासोबत चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली असली तरी ...

साक्षी म्हणतेय, टिव्ही हे माझे पहिले प्रेम
स क्षी तन्वर दंगल या चित्रपटात प्रमुख भमिका साकारत आहे. आमिर खानसारख्या अभिनेत्यासोबत चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली असली तरी टिव्ही हेच माझे पहिले प्रेम असल्याचे साक्षी तन्वर सांगते. साक्षीने छोट्या पडद्यावरून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिच्या अनेक मालिका, त्यातील भूमिका गाजल्या आहेत. छोटा पडदा हे माझ्यासाठी सर्व काही आहे. छोट्या पडद्याचा मला प्रचंड अभिमान आहे असे साक्षीचे म्हणणे आहे. साक्षी 24 या मालिकेच्या दुसऱ्या सिझनमध्येे प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. छोट्या पडद्यावर भूमिका साकारताना ती नेहमीच चोखंदळ असते. ती सध्या चित्रपटात काम करत असली तरी चांगल्या भूमिका ऑफर्स झाल्या तर छोट्या पडद्यावर काम करायला नक्कीच आवडेल असे ती सांगते.