'सावळ्याची जणू सावली' मालिकेत सावली-सारंगच्या नात्यात पुन्हा येणार दुरावा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 15:12 IST2025-02-27T15:11:47+5:302025-02-27T15:12:49+5:30
Savalyanchi Janu Savali Serial : 'सावळ्याची जणू सावली' मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे.

'सावळ्याची जणू सावली' मालिकेत सावली-सारंगच्या नात्यात पुन्हा येणार दुरावा?
'सावळ्याची जणू सावली' मालिके(Savalyanchi Janu Savali Serial)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सावली आणि सारंगची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावते. सध्या मालिका रंजक वळणावर आली आहे. सावली सारंगसाठी व्रत ठेवण्याचा निर्णय घेते. ऐश्वर्या हे लक्षात आल्यावर संधीचा फायदा घेऊन सावलीला अपमानित करण्याचा आणि तिचा व्रत तोडण्याचा प्रयत्न करते. ती संपूर्ण कुटुंबासमोर सावलीला कमी लेखण्याचा प्रयत्न करत असतानाही सावली ठाम आहे.
दरम्यान , सारंग घरी परतताना त्याच्या सोबत एक लहानसा अपघात घडतो, ज्यामुळे सर्वजण चिंतेत आहेत. सावलीही त्याच्या मदतीसाठी धावत येते. सारंग सावलीच्या या काळजीने प्रभावित होऊन तिला एका नव्या दृष्टीने पाहायला सुरुवात करतो. या सगळ्यात तिलोत्तमा सोहमसाठी मुलगी बघतेय, पण सोहमच तारा वर प्रेम आहे. तारा सावलीकडे हा साखरपुडा थांबवण्यासाठी मदत मागते. सावली साखरपुडा तोडण्यासाठी मार्ग शोधायला लागलेय. पण तिच्या या प्रयत्नांमुळे घरात तणाव निर्माण होतो आणि या सगळ्यामुळे सारंग आणि सावलीचा संबंधात पुन्हा एकदा अंतर येऊ लागलंय.
आता तारा सोहमला मदत करण्याच्या विचार सावली मागे घेईल की सारंगसोबतचं आपलं नातं सुधारेल? सावली आणि सारंगच्या नात्यात पुन्हा दुरावा येईल का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.