वेबसीरिजसाठी तेजश्री प्रधान 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिका सोडणार? पोस्टमध्ये स्पष्टच म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 13:42 IST2025-11-01T13:39:51+5:302025-11-01T13:42:08+5:30
अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) 'वीण दोघांतली ही तुटेना' ही मालिका सोडणार असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

वेबसीरिजसाठी तेजश्री प्रधान 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिका सोडणार? पोस्टमध्ये स्पष्टच म्हणाली...
अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) 'वीण दोघांतली ही तुटेना' ही मालिका सोडणार असल्याच्या चर्चांना सध्या पूर्णविराम मिळाला आहे. तेजश्री एका वेबसीरिजसाठी ही मालिका सोडणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, या सर्व चर्चा खोट्या असल्याचं तेजश्रीने सोशल मीडियावर थेट इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करून सांगितलं आहे.
तेजश्री प्रधानने नुकतेच इंस्टाग्राम स्टोरीवर तिने वेबसीरिजमध्ये झळकणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर ती या सीरिजसाठी 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिका सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. मात्र शेवटी तिने या चर्चांमध्ये अजिबात तथ्य नसल्याचे इंस्टा स्टोरीवर पोस्ट शेअर करत सांगितले. तिने आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे मीडिया आणि रिपोर्टर्सना विनंती केली आहे की, "'वीण दोघांतली ही तुटेना' मालिका सोडण्याचा माझा कुठलाही विचार नाही. तरीही आपल्या अर्धवट माहितीद्वारे व्ह्युजसाठी बातम्या छापून आणू नयेत. झी मराठीशी असलेली ही वीण तुटणे नाही. लोभ असावा." यावरून हे स्पष्ट होते की, तेजश्री 'स्वानंदी'च्या भूमिकेतून सध्या तरी प्रेक्षकांचा निरोप घेणार नाही.

वर्कफ्रंट
तेजश्री प्रधान सध्या 'झी मराठी'वरील 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. यापूर्वी तिने 'होणार सून मी ह्या घरची' या लोकप्रिय मालिकेत 'जान्हवी'ची भूमिका साकारून प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. मालिकांबरोबरच तेजश्रीने चित्रपटांतूनही आपला ठसा उमटवला आहे. 'ती सध्या काय करते' आणि 'बांबू' यांसारख्या चित्रपटांतील तिच्या भूमिका लक्षणीय ठरल्या आहेत. तसेच लवकरच ती वेबसीरिजमध्येदेखील झळकणार आहे. सध्या ती त्याचे शूटिंग करत आहे. तिने याची झलक सोशल मीडियावर दाखवली होती.