श्वेता देणार अक्कासाहेबांना शह?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 16:21 IST2016-06-16T10:51:58+5:302016-06-16T16:21:58+5:30
पुढचे पाऊल या मालिकेत अभिनेत्री माधवी निमकरची लवकरच एंट्री होणार आहे. या मालिकेत ती श्वेता ही व्यक्तिरेखा साकारत असून ...
श्वेता देणार अक्कासाहेबांना शह?
प ढचे पाऊल या मालिकेत अभिनेत्री माधवी निमकरची लवकरच एंट्री होणार आहे. या मालिकेत ती श्वेता ही व्यक्तिरेखा साकारत असून श्वेताचे सरदेशमुख कुटुंबासोबत अनेक वर्षांपासून वैमनस्य आहे. सरदेशमुख कुटुंबाला नष्ट करण्याच्या हेतूनेच ती घरात येणार आहे. सध्या अक्कासाहेब मुंबईत असल्याने अक्कासाहेबांना त्या घरात नसताना कोणत्या गोष्टी घडत आहे याची कल्पनाच नाहीये. अक्कासाहेब नसण्याचा फायदा घेऊनच श्वेता सरदेशमुख कुटुंबाला सतवण्यासाठी त्यांच्या घरात येणार आहे. माधवीची एंट्री याच आठवड्यात मालिकेत होणार असून तिच्या एंट्रीनंतर मालिकेच्या कथानकाला एक वेगळे वळण मिळणार आहे.