राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 16:54 IST2025-12-18T16:54:22+5:302025-12-18T16:54:46+5:30
Rakhi Sawant : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतने पुन्हा एकदा लग्नाबद्दल असे काही विधान केले आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत तिच्या बेधडक आणि बिनधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. आता देखील ती पुन्हा एकदा बेधडक विधानामुळे चर्चेत आली आहे. यावेळी तिने जे काही वक्तव्य केलेले आहे, ते ऐकून सगळे हैराण झाले आहेत. तिला उगाच ड्रामा क्वीन म्हटलं जात नाही. ती असं काही म्हणून जाते ज्यामुळे काही ना काही ड्रामा क्रिएट होतो आहे. यावेळी तिने पुन्हा लग्न करण्याबद्दल असं काही वक्तव्य केलं जे चर्चेत आलं आहे.
राखी सावंत नुकतीच मनीषा रानीच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती. तिथे तिने पुन्हा एकदा लग्नाबद्दल असे काही विधान केले आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. पॉडकास्टमध्ये मनीषाने राखी सावंतला विचारले की, "जर तुला पुन्हा 'स्वयंवर' करण्याची संधी मिळाली, तर तू कोणत्या सेलिब्रिटींना बोलावशील?" यावर उत्तर देताना राखी सावंत म्हणाली की, "जर तिचे स्वयंवर झाले तर ती सर्वात आधी बाबा रामदेव यांना बोलावेल आणि त्यानंतर राहुल गांधी यांना बोलावण्यास तिची पसंती असेल."
"सेलिब्रिटींना कोण बोलावणार? ते सगळे...."
जेव्हा मनीषाने तिला पुन्हा टोकले की, "हे सर्वजण राजकारणाशी संबंधित आहेत, पण मी तुला सेलिब्रिटींबद्दल विचारत आहे, तू कोणत्या अभिनेत्याला बोलावशील?" तेव्हा राखीने आपल्या खास शैलीत उत्तर दिले की, "सेलिब्रिटींना कोण बोलावणार? ते सगळे कंगाल आहेत." राखीचे हे उत्तर ऐकून चाहते हसून हसून लोटपोट झाले आहेत.
राखीचे वैयक्तिक आयुष्य
राखीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर तिने आतापर्यंत दोन लग्ने केली आहेत, परंतु दोन्ही लग्ने यशस्वी ठरली नाहीत. राखी सावंत सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते आणि इंस्टाग्रामवर तिचे १४.२ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.